ड्रोना स्पोर्ट्स अकॅडमीच्या १९ खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी

राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी ११ खेळाडूंची निवड

डोंबिवली: ऑल महाराष्ट्र स्टेट किकबॉक्सिंग स्पर्धा २०२५ मध्ये ठाणे जिल्ह्याच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यभरात ठाण्याचं नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्रातून १६०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला असून यात ठाणे जिल्ह्याच्या ३३ खेळाडूंनी एकूण ३४ पदक जिंकले.

या यशात ड्रोना स्पोर्ट्स अकॅडमीचे १९ खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेतून ११ खेळाडूंची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून ही अभिमानाची बाब आहे. या यशाबद्दल किकबॉक्सिंग स्पोर्ट्स वेल्फेअर फाउंडेशन ठाणे अध्यक्ष शुभम मिश्रा, तसेच ड्रोना स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक अनंत पाटील आणि मनोहर पाटील यांनी सर्व खेळाडूंना विशेष कौतुक केले.तसेच कासा बेला गोल्ड चेअरमन व कल्याण ग्रामीणचे उपाध्यक्ष योगेश पाटील यांनी सर्व पदकविजेते व निवड झालेल्या खेळाडूंना सन्मानित करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सुवर्ण पदक विजेते: पुष्यजा सरकार, अवनी केडिया, वेदिका त्रिपाठी, आभा दरेकर, रेवा सक्सेना, अवनीश सामंता, दुर्वेश टेवर,वेदांशी चिम्मानी

रौप्य पदक विजेते: तारूशी सिजीत, विराज सुभेदार,शाश्वत मोदी

कांस्य पदक विजेते: स्रग्वी साळुंखे, ध्रुव अमिन, गतिक नायक,.आन्या जैन, नम्रता गुप्ता, अद्विक माजिला, हार्दिक जैन, गौरी भटनागर