भाईंदर: भाईंदर येथील रहिवासी आणि ‘फॉर फ्युचर इंडिया’ चे संस्थापक हर्षद ढगे यांनी उत्तन येथील जंजिरे धारावी किल्ल्याजवळ मृत समुद्री कासव दिसल्याचे सांगितले.
वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे, ठाणे, मुंबई कांदळवन संधारण घटक यांच्या आदेशानुसार वनरक्षक ज्ञानेश्वर म्हस्के, प्रकल्प सहयोगी अमेय भोगटे, सुशांत मोरे आणि एमएसएफचे जवान घटनास्थळी पोहोचले. मृत कासवाची ओळख पटविण्यात आली आणि त्याचे मोजमाप घेण्यात आले. त्याचा पंचनामा करुन त्याला मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुरण्यात आले. मृत कासव ऑलिव्ह रिडले या जातीची मादी होती.