दुबईत सोमवारी न्यूझीलंडची पाकिस्तानशी भेट होणार आहे. न्यूझीलंडने त्यांच्या तीन साखळी सामन्यांपैकी दोन जिंकले आहेत, तर पाकिस्तानने त्यांच्या तीन साखळी सामन्यांपैकी एक जिंकला आहे. ‘अ’ गटातील या दोन्ही संघांचा हा शेवटचा साखळी सामना आहे.
आमने-सामने
न्यूझीलंड आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध ११ आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी न्यूझीलंडने नऊ आणि पाकिस्तानने दोन जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात ते तीनदा आमनेसामने आले आहेत आणि त्या सगळ्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
संघ
न्यूझीलंड: सोफी डीवाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज, मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, अमिलिया कर, जेस कर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅन्ना रोव, लिया ताहुहू
पाकिस्तानः फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमायमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
अमिलिया कर: उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करणारी न्यूझीलंडची ही अष्टपैलू खेळाडू या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामन्यांत सात विकेट्स घेऊन तिच्या संघाची आघाडीची विकेट घेणारी खेळाडू आहे. त्याचबरोबर बॅटने तिने ७६ धावा केल्या आहेत, ज्यात नाबाद ३४ धावांच्या खेळीचा समावेश आहे.
जॉर्जिया प्लिमर: न्यूझीलंडच्या या उजव्या हाताच्या सलामीवीराने या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामन्यांत ९१ धावा केल्या आहेत. तिने एक अर्धशतकही झळकावले आहे.
निदा दार: पाकिस्तानची ही अनुभवी अष्टपैलू खेळाडू या विश्वचषकात तिच्या संघासाठी आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये ६१ धावा करत सर्वात प्रभावी फलंदाज ठरली आहे. शिवाय, चेंडूसह, ती तिच्या ऑफ स्पिन गोलंदाजीने योगदान देऊ शकते.
सादिया इक्बाल: पाकिस्तानच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने या विश्वचषकात आतापर्यंत तिच्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. तिने तीन सामन्यांत पाच विकेट्स घेतल्या आहेत. तसेच, प्रति षटक जवळपास पाच धावांच्या इकॉनॉमीने तिने किफायतशीर गोलंदाजी केली आहे.
हवामान
हवामान थोडे उबदार असेल कारण तापमान ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. अपेक्षित आर्द्रता ४३% आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १४ ऑक्टोबर २०२४
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार