ठाणे : येथील प्रसिद्ध फिटनेस “नायट्रोजिम” चा १५ वा वर्धापन दिन ठाण्याच्या फ्लॉवर व्हॅली येथील जिममध्ये साजरा करण्यात आला. या १५ व्या वर्धापन दिनाला दाक्षिणात्य अभिनेता अनुपसिंग ठाकूर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उपस्थिती दर्शवत शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी ठाण्याच्या फ्लॉवर व्हॅली येथील फिटनेस जिममध्ये मोठ्या उत्साहात केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना फिटनेस जिमचे संचालक प्रबोध डावखरे म्हणाले, आता नायट्रोजिम देशा सोबतच दुबईमध्ये सुरु होणार आहे. फिटनेस सेंटर सुस्थापित चालविण्यासाठी जिम साठी लागणारे साहित्य विदेशातून मागविताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये सवलतीची अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आहे. फिटनेस सेंटरसाठी सरकारच्या वतीने विशेष सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे श्री. डावखरे यांनी सांगितले. तर सेलिब्रिटींमध्ये दाक्षिणात्य अभिनेता आणि हिंदी सिनेमात भूमिका केलेल्या नायट्रोजिम एकेकाळचा सदस्य अनुपसिंग ठाकूर यांनीही जिमला शुभेच्छा दिल्या. प्रत्येकाच्या जीवनात फिटनेसचे खूप महत्व आहे. त्यामुळे नायट्रोजिममध्ये येऊन आरोग्य चांगले ठेवावे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
बाळासाहेबांची शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनीही जिमला शुभेच्छा दिल्या. नायट्रोजिमने खूप प्रगती केली. जिमचा विस्तार आता दुबईपर्यंत गेला आहे. जिमने सदृढ तरुण घडविण्याचे चांगले काम केले आहे. वर्धापनदिनी नायट्रोजिम आणि प्रबोध डावखरे यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर जिमच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रबोध डावखरे यांनी म्हस्के यांचे स्वागत केले.