साडेनऊ कोटी मतदार ठरवणार महायुती आणि मविआचे भविष्य

* २० नोव्हेंबरला मतदान
* २३ तारखेला निकाल

नवी दिल्ली: महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच टप्प्यात होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

दिल्लीमधील केंद्रीय विज्ञान भवन या ठिकाणी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली आणि या तारखा जाहीर केल्या. 26 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेची मुदत संपणार आहे.

राज्यात एक लाख १८६ मतदार केंद्र आहेत. या केंद्रावरून राज्यभरात मतदान पार पडेल. तर राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार असून त्यामध्ये ४ कोटी ९३ लाख महिला मतदार असून ४. ६० पुरुष मतदार आहेत. तर १८ लाख ६७ हजार मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. सहा लाख दोन हजार दिव्यांग मतदार असून १२ लाख पाच हजार ज्येष्ठ मतदार आहेत. एकूण १ लाख १८६ मतदार केंद्र असून ५७,६०१ ग्रामीण भागात आणि ४२,५८२ शहरी भागात मतदान केंद्र आहेत. एका मतदान केंद्रावर सरासरी ९६० मतदार मतदान करणार आहेत.

८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. मतदारांसाठी सुविधा पोर्टल ॲप निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आले आहे. या ॲपवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.

एटीएमसाठी पैसै घेऊन जाणाऱ्या गाडीला निवडणूक काळात रात्री 6 ते सकाळी 8 पर्यंत पैसे वाहतूक करता येणार नाही. राज्यातील पैसा, ड्रग्ज आणि दारुच्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात येईल. याकाळात अँब्युलन्स, बँक आणि पतसंस्था यावर देखील लक्ष ठेवलं जाईल. 17 सी कॉपी पोलिंग एजंटला मतदान संपताच दिले जातील. यावर किती मतदान झालं याची माहिती असेल. सोशल मीडियात फेक, डीफ फेक प्रकार घडला तर कडक कारवाई होईल, माहिती अशी राजीव कुमार यांनी दिली.

* निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024
* अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
* अर्जांची तपासणी: 30 ऑक्टोबर 2024
* अर्ज मागे घेण्याची तारीख:4 नोव्हेंबर
* मतदान: 20 नोव्हेंबर 2024
* मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024
* एकूण मतदारसंघ: 288
* एकूण मतदार : 9 कोटी 63 लाख
* नव मतदार: 20.93 लाख
* पुरूष मतदार: 4.97 कोटी
* महिला मतदार: 4.66 कोटी
* युवा मतदार: 1.85 कोटी
* तृतीयपंथी मतदार: 56 हजारांहून जास्त
* 85 वर्षावरील मतदार: 12.48 लाख
* शंभरी ओलांडलेले मतदार: 49 हजारांहून जास्त
* दिव्यांग मतदार: 6.32 लाख
* एकूण मतदान केंद्र: 1 लाख 186
* शहरी मतदार केंद्र: 42,604
* ग्रामीण मतदार केंद्र: 57,582
* एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार: 960