न्यूझीलंड आणि पाकिस्तान एका ‘मस्ट विन’ सामन्यात आमने सामने

Photo credits: AP

भारताच्या श्रीलंकेवर शानदार विजयानंतर, यजमान आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला आहे. तीन जागा अजूनही रिकाम्या आहेत आणि उरलेल्या नऊ संघांपैकी बांगलादेश वगळता बाकी आठही संघांना आपले नाव उपांत्य फेरीसाठी नोंदवायची संधी आहे.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया ज्या दमदार फॉर्ममध्ये खेळत आहेत, ते पाहता भारतासोबतच उपांत्य फेरीत प्रवेश करणारे हे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील अशी दाट शक्यता आहे. तथापि यापैकी केवळ एक संघच उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता आहे. जर हे दोन्ही संघ पुढे गेले तर फक्त एक जागा उरेल आणि म्हणूनच न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला खूप महत्त्व आहे.

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा ३५ वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात ४ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.

 

न्यूझीलंड आणि पाकिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांनी १९७३ पासून एकमेकांविरुद्ध ११५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी न्यूझीलंडने ५१ जिंकले आहेत, पाकिस्तानने ६० जिंकले आहेत, एक सामना टाय झाला आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी एकमेकांविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि दोन्ही न्यूझीलंडने जिंकले आहेत. विश्वचषकात पाकिस्तानने किवीसविरुद्ध ७-२ अशी आघाडी घेतली आहे.

  न्यूझीलंड पाकिस्तान
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने ५१ ६०
भारतात
विश्वचषकात

  

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील न्यूझीलंड आणि पाकिस्तानची आतापर्यंतची कामगिरी

न्यूझीलंड आणि पाकिस्तान आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला आठवा सामना खेळतील. सात सामन्यांपैकी न्यूझीलंडने चार आणि पाकिस्तानने तीन सामने जिंकले आहेत. एकीकडे पाकिस्तानची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सुमार दिसून आले आहे तर दुसरीकडे न्यूझीलंडचा आत्मविश्वास मागील तीन सामने हरून घसरला असेल.

 

सामना क्रमांक न्यूझीलंड पाकिस्तान
इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव
नेदरलँड्सचा ९९ धावांनी पराभव श्रीलंकेचा ६ विकेटने पराभव
बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव भारताकडून ७ विकेटने पराभव
अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव ऑस्ट्रेलियाकडून ६२ धावांनी पराभव
भारताकडून ४ विकेटने पराभव अफगाणिस्तानकडून ८ विकेटने पराभव
ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभव दक्षिण आफ्रिकेकडून १ विकेटने पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून १९० धावांनी पराभव बांगलादेशचा ७ विकेटने पराभव

 

संघ

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.

पाकिस्तान: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.

Photo credits: Reuters/Samuel Rajkumar

 

 

 

 

 

दुखापती अपडेट्स

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री बुधवारी पुण्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात उजव्या हॅमस्ट्रिंगला दुखापत झाल्यामुळे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी काइल जेमिसनची निवड करण्यात आली आहे. याशिवाय, वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन टाचेच्या दुखापतीमुळे मागील सामना खेळू शकला नाही. तो आता फिट झाला असून पाकिस्तानसमोर खेळेल. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि मार्क चॅपमन अनुक्रमे अंगठ्याच्या आणि काफच्या दुखापतीतून अजून बरे झाले नाहीत. पाकिस्तानसाठी, त्यांचा अष्टपैलू शादाब खान, ज्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्षेत्ररक्षण करताना दुखापत (कंकशन) झाली होती, तो तंदुरुस्त घोषित झाल्यास तो न्यूझीलंडविरुद्ध खेळू शकतो. तसेच वेगवान गोलंदाज हसन अली, जो आजारपणामुळे मागील दोन सामन्यांना मुकला होता तो न्यूझीलंडच्या सामन्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

 

खेळण्याची परिस्थिती

बेंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना हे ठिकाण आयोजित करेल. प्रथम आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे. मैदानाचे छोटे परिमाण पाहता, दोन्ही संघांकडून अनेक धावा होण्याची अपेक्षा आहे.

 

हवामान

हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. दुपारी पाऊस पडू शकतो. दिवसभरात कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. ७८% ढगांचे आच्छादन, पावसाची ६८% शक्यता आणि गडगडाटी वादळाची २७% शक्यता असेल. वारा पूर्वेकडून वाहेल.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

रचिन रवींद्र: न्यूझीलंडच्या या वरच्या फळीतील फलंदाजाने सात सामन्यांमध्ये ७० च्या सरासरीने आणि १०६ च्या स्ट्राइक रेटने ४१५ धावा केल्या आहेत. त्याने डाव्या हाताच्या फिरकीने तीन बळीही घेतले आहेत.

मिचेल सँटनर: सात सामन्यांत १४ बळी घेऊन हा डावखुरा फिरकी गोलंदाज किवीससाठी मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी करत आहे.

मोहम्मद रिझवान: पाकिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज त्याच्या संघासाठी सात सामन्यांत ७२ च्या सरासरीने आणि ९९ च्या स्ट्राईक रेटने ३५९ धावा करत सर्वात लक्षणीय कामगिरी करणारा खेळाडू ठरला आहे.

शाहीन आफ्रिदी: पाकिस्तानचा 23 वर्षीय डावखुरा वेगवान गोलंदाज सात सामन्यात १६ बळी घेऊन त्याच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तो नवीन चेंडूने उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे आणि शेवटच्या षटकांमध्येही तितकाच प्रभावी आहे.

 

आकड्यांचा खेळ

  • टॉम लॅथमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्यासाठी ५२ धावांची गरज
  • जिमी नीशमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ५ धावांची गरज
  • लॉकी फर्ग्युसनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज
  • हसन अलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची गरज
  • ट्रेंट बोल्टला विश्वचषकात ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी १ विकेटची गरज

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ४ नोव्हेंबर २०२३

वेळ: सकाळी १०:३० वाजता

स्थळ: एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)