हाके यांच्याविरोधात अंबरनाथ पोलिसांत राष्ट्रवादीची तक्रार

अंबरनाथ : राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात सार्वजनिक माध्यमातून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोलिसांना निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) चे शहर युवक काँग्रेस उपाध्यक्ष ॲड. विनय शर्मा यांनी यासंदर्भात आज रविवार 6 जुलै रोजी अंबरनाथ पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावेळी प्रदेश सरचिटणीस किसन तारमळे, कमलाकर सूर्यवंशी, प्रेमा केंगार, शीला लामतुरे, अशोक चव्हाण, अन्वर सय्यद, बी.रमेश आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पक्षाचे अध्यक्ष आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत हाके यांनी आक्षेपार्ह, द्वेषपूर्ण आणि अपमानास्पद भाषा वापरली आहे, त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होऊन भावना दुखावण्याबरोबरच शांतता भंग होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे श्री .हाके यांच्याविरोधात तक्रार नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अंबरनाथ पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्याची माहिती उपाध्यक्ष ॲड. मिश्रा यांनी केली आहे.