पाच हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्त जीवनाची शपथ

ठाणे : ठाणे शहरातील तब्बल पाच हजारांहून अधिक शाळकरी मुलांनी ‘आम्ही कधीही नशेच्या आहारी जाणार नाही, अंमली पदार्थांपासून दूर राहू’ अशी शपथ घेतली.

‘अणुव्रत विश्व भारती सोसायटी’ने आयोजिलेल्या ‘अणुव्रत गीत महासंगान’ कार्यक्रमावेळी रेमंड मैदानावर मुले उत्साहाने जमली होती. अणुव्रत अनुष्ठान आचार्य महाश्रमणजी यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचा यावेळी सर्वांना लाभ झाला.

राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, ‘मित्र’चे अध्यक्ष अजय आशर, अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील, मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती के.के. ताटेड याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मानवाधिकार आयोगाचे सदस्य एम.ए. सय्यद, आमदार निरंजन डावखरे, शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. ‘जीतो एपेक्स’चे चेअरमन सुखराज नहार, जीतो मुंबई विभागाचे अध्यक्ष पृथ्वीराज कथारी, जीतो ठाणे चेअरमन दीपक भेडा, टोरेंट पॉवरचे कार्यकारी संचालक जगदीश चेलारामानी, ‘रेमंड ग्रुप’चे चेअरमन शांतीलाल पोखरणा, रोटरी 3142 चे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. मयुरेश वर्के, शिरीष सोंगाडकर आदी उपस्थित होते.