WPL २०२५ ची रोमहर्षक सुरुवात झाली आहे. शुक्रवारी गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने गुजरात जायंट्सविरुद्ध अविश्वसनीय विजय (१८.३ षटकांत ६ विकेट्स राखून २०२ धावांचा पाठलाग) नोंदवला. आता सर्वांच्या नजरा पुढील धमाकेदार चकमकीवर आहे – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स. WPL २०२३ (स्पर्धेचा पहिला हंगाम) चे विजेते मुंबई इंडियन्स शनिवारी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर दोन वेळा अंतिम फेरीत पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लढतील.
आमने-सामने
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स एकमेकांविरुद्ध पाच सामने खेळले आहेत, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स ३-२ च्या फरकाने आघाडीवर आहे.
संघ
मुंबई इंडियन्स: अमनजोत कौर, अमिलिया कर, क्लोई ट्रायॉन, हरमनप्रीत कौर (कर्णधार), हेली मॅथ्यूज, जिंतिमनी कलिता, नॅट सिव्हर-ब्रंट, सायका इशाक, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), शबनीम इस्माईल, एस सजना, अमनदीप कौर, कीर्थना बालक्रिष्णन, जी कमलिनी (यष्टीरक्षक), संस्क्रीती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी, नदिन डी क्लर्क
दिल्ली कॅपिटल्स: ॲलिस कॅप्सी, अरुंधती रेड्डी, जेमिमाह रॉड्रिग्स, जेस जोनासन, मारिझान काप, मेग लॅनिंग (कर्णधार), मिन्नू मणी, राधा यादव, शफाली वर्मा, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), तीतास साधू, ॲनाबेल सदरलँड, एन चरनी, नंदिनी कश्यप (यष्टीरक्षक), सारा ब्राइस (यष्टीरक्षक), निकी प्रसाद
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
हरमनप्रीत कौर – मुंबई इंडियन्सची कर्णधार WPLमध्ये तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. पाच अर्धशतकांसह १६ डावात ५४९ धावा आणि नाबाद ९५ धावांसह ती MIच्या फलंदाजी क्रमवारीतील महत्त्वाचा भाग आहे.
हेली मॅथ्यूज – वेस्ट इंडिजची अष्टपैलू खेळाडू WPL २०२३मध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज होती. एकूण १९ डावात २३ विकेट्स घेऊन ती MI साठी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. याशिवाय, या सलामीवीराने ४५१ धावांचे योगदान केले आहे.
मेग लॅनिंग – दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने १८ डावात ६७६ धावा करून WPLमध्ये सार्वधिक धावा करण्याच्या यादीत अव्वल क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. या उजव्या हाताच्या सलामीवीराने १३१ च्या स्ट्राइक रेटने आणि ४२ च्या सरासरीने सहा अर्धशतके ठोकली आहेत.
मारिझान काप – दक्षिण आफ्रिकेतील या अनुभवी खेळाडूने WPLमध्ये अद्भुत कामगिरी केली आहे. १६ डावात २० विकेट्ससह, तिची नवीन चेंडू गोलंदाजी आणि भैरवीच्या षटकांतील प्रदर्शन अप्रतिम राहिले आहे. याव्यतिरिक्त, तिने १३ डावांमध्ये २५६ धावा केल्या आहेत, ज्यामुळे ती एक मौल्यवान खेळाडू बनली आहे.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: फेब्रुवारी १५, २०२५
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
ठिकाण: कोटंबी स्टेडियम, वडोदरा
प्रक्षेपण: जिओहॉटस्टार