नवरा-बायकोच्या भांडणात मध्यस्थी; नातेवाईकाची हत्या, तिघांना अटक

ठाणे : मावस बहीण आणि तिच्या पतीच्या भांडणात नातेवाईक मावस भावाने मध्यस्थी केली. त्यामुळे या रागातून पतीच्या तीन भावांनी आपसात संगनमताने मध्यस्थी करणाऱ्या भावाला चाकूने भोसकून जीवे ठार मारल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

ही घटना भिवंडीतील शांतीनगर येथील न्यू आझाद नगरमधील निजामिया हॉटेलजवळ 26 जानेवारीला घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत तीन आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली आहे.

दिलशाद शहा (23) असे मृतकाचे नाव आहे. या हत्येप्रकरणी आसिफ अब्दुल हकीम शहा, अलीहसन अब्दुल हकीम शहा, मुझफ्फर अब्दुलहकीम शहा अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भावांची नावे आहेत.