महाराष्ट्रभूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांची जन्मशताब्दी
ठाणे: समाजसेवा आणि अध्यात्माचा वारसा पुढे चालवण्यासाठी महाराष्ट्रभूषण डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्तीनिमित्त 1 मार्च 2023 रोजी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी, नौपाडा, उथळसर, वागळे, वर्तकनगर, कासारवडवली, माजिवडा – मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समितीच्या परिसरात 7256 श्रीसदस्यांनी 59.81 टन कचरा जमा केला आणि 288 किमी रस्त्यांची स्वच्छता केली.
समाजाप्रती आपले असलेले ऋण याची जाणीव होण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच समाजोपयोगी, सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यात येतात. आपण आपल्या घराची, गावाची, परिसराची व पर्यायाने देशाची स्वच्छता करणे हे आपले कर्तव्य आहे ह्या मानवी नीतिमूल्याची शिकवण प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजावी म्हणून या उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते.
याप्रसंगी नगरसेवक, शासकिय कार्यालयातील अधिकारी, महापालिका अधिकारी आणि कर्मचारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मुंब्रा विभागातील दाऊदी बोहरा समाजातील विविध संघटनांनी विशेष सहभाग घेतला. प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
डोंबिवली, दिवा-मुंब्र्यातही अभियान
डोंबिवली शहर, दिवा आणि मुंब्रा भगत झालेल्या अभियानात ५१९८ श्रीसदस्यांनी सहभाग घेतला. ओला व सुका कचरा मिळून एकूण ६३.८० टन घनकचरा उचलण्यात आला. एकूण १७२ किलोमीटर रस्ते सफाई करण्यात आली. यासाठी महापालिकांच्या वाहनांव्यतिरिक्त बैठकीच्या माध्यमातून सात तीन चाकी टेम्पो, सहा चार चाकी टेम्पो, सहा डम्पर आणि चार जेसीबी या वाहनांचा वापर करण्यात आला.