आयोजक आणि यात्रेकरूंच्या भावना
ठाणे: कैलास मानसरोवर यात्रा हा केवळ एक प्रवास नसून एक आध्यात्मिक अनुभव आहे. भगवान शिवाच्या कृपेनेच आम्हा सर्वांना प्रथम यात्रेकरू होण्याचे भाग्य लाभले, असे या यात्रेचे आयोजक व ठाणेकर नागरिक असलेले राकेश पुर्णेकर यांनी सांगितले आहे.
पाच वर्षांपासून बंद असलेले पवित्र कैलास मानसरोवर यात्रा १५ जुलै २०२५ पासून पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीमुळे २०२० पासून यात्रेवर लागलेली बंदी आता उठवण्यात आल्याने भाविकांना कैलास मानस सरोवर यात्रा करता येणार आहे.
कैलास मानसरोवर यात्रेच्या पहिल्या तुकडीमध्ये राकेश पुर्णेकर यांच्यासह रेखा पाटील, वर्षा चौधरी, मोना म्हात्रे, हर्षला चौधरी, भानुमती पाटील, आरती भोईर, रचना पाटील, मोनिका भोईर, मनीषा कीणे, करुणा पाटील, गिरीजा पाटील, बेबी चौधरी, प्रीतीशा पाटील, चम्पा भोईर, भारती म्हात्रे, तनिष्का चौधरी, ओम चौधारी, जोत्स्ना पाटील, उज्वला ठाकरे, प्रियांका चोरघे, आर्या चौधरी, मीनाक्षी पाटील, यांचा समावेश आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी इच्छुक भाविकांनी राकेश पूर्णेकर यांच्याशी ९८६७००३३२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.