कडोंमपा शिवसेना-भाजपाकडे

शिवसेनेचे ५२ तर भाजपाचे ५१ नगरसेवक विजयी

कल्याण: बहुप्रतीक्षेत असलेली कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक पार पडून निकाल लागला आहे. या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाचे वर्चस्व राहिले असून शिवसेनेचे 52 तर भाजपाचे 51 नगरसेवक विजयी झाले आहेत.

या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 11, मनसेचे 5, कॉंग्रेसचे 2 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये माजी महापौर वैजयंती घोलप, उपमहापौर विक्की तरे, माजी नगरसेवक मयूर पाटील, विद्याधर भोईर, संजय पाटील, नीलिमा पाटील, कस्तुरी देसाई, संदीप गायकर, शैलेष धात्रक, मनीषा धात्रक, नितीन पाटील, रवी पाटील या दिग्गज नगरसेवकांचा समावेश आहे.

आता सत्तेच्या सारीपाटात महापौर पदासाठी शिवसेना-भाजपा महायुतीचा महापौर बसविणार कि शिवसेना आणि भाजपा हे उबाठा, मनसे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची मदत घेऊन अंबरनाथ प्रमाणे सत्ता स्थापन करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

शिवसेना-52, भाजपा-51, उबाठा-11, मनसे-5, काँग्रेस-2, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार-1, एकूण-122