सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपाचे ११ विद्यार्थी झळकले
ठाणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 198, मराठी, मुंब्रा येथील विद्यार्थिनी ईश्वरी मंजारे हिने 300 पैकी तब्बल 260 गुण मिळवत 86.66 टक्के गुण प्राप्त करीत ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका शाळांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांमध्ये तिने पाचवा क्रमांक मिळवला आहे.
शाळा क्र. 63 ची उर्दु माध्यमाची विद्यार्थीनी झोबिया मोहम्मद अयाज हिने 71.33 गुण प्राप्त करीत जिल्ह्यातून 109 वा क्रमांक प्राप्त केला आहे. ईश्वरी आणि झोबिया या विद्यार्थीनीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर शर्मिला पिंपळोलकर आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
महानगरपालिका शाळांच्या कामगिरीत ठाणे मनपाने 86.66 टक्के गुणांसह अव्वल स्थान मिळविले आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षांची तयारी, नियमित सराव, शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन यामुळे मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. ईश्वरीने मिळविलेले यश हे तिच्या मेहनतीसोबतच शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन यांचेही फलित आहे.
उपायुक्त डॉ. मिताली संचेती आणि शिक्षणाधिकारी शेषराव बढे यांनीही ईश्वरीचे अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ठामपा उर्दु शाळेचे 10 तर हिंदी माध्यमाच्या एका विद्यार्थीनाने गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे. उर्दु माध्यम शाळा क्र. 109मधील अब्रीन बानो मोहम्मद शाहीद, शाळा क्र. 108मधील सालमणी आाशिया खातून, शाळा क्र. 100मधील अब्दुल अजीज, शाळा क्र. 109मधील खान अबु नुमन अब्दुल वफा, खान अबान हकीक, शहा अहमद अली अब्दुल अजीज,शाळा क्र. 125 मधील खान अबु हुजायफा, शाळा क्र. 100मधील सरीम मुमताज अहमद, कुरेशी अबु बकार मेहबूब आलम, शाळा क्र. 108मधील शेख अहाद मोहिद हुसेन, शाळा क्र. 125मधील सिध्दीकी अब्दुल्ला जुल्बा जादेन शफी उद्दीन, शाळा क्र. 109मधील अबुलाबाबा अबुजार, हिंदी माध्यम शाळा क्र. 54मधील वर्षा मिस्त्री यांनी यादीत स्थान मिळवले.
ठाणे जिल्ह्यातील मनपा शाळांचा निकाल
ठाणे: 86.66टक्के, कल्याण-डोंबिवली: 84.66टक्के, नवी मुंबई: 80.66टक्के, भिवंडी: 80टक्के,
भाईंदर: 71.81टक्के, उल्हासनगर: 61.11टक्के