ठाण्यात नवीन तीन रूग्णांसह आकडा २२वर
ठाणे : शहरातील एच3एन2 (इन्फ्लुएन्झा) या रोगाची लागण झालेले तीन नवीन रूग्ण सापडले असून या रोगाच्या एकूण रुग्णांची संख्या ठाणे शहरात २२ झाली आहे ठाणेकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाने केले आहे.
देशात आणि राज्यात कोरोना आणि एच3एन2 या रुग्णांची संख्या वाढत आहे. ठाणे शहरात मागील आठवड्याभरापासून आत्तापर्यंत २२ रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी सात रुग्णांवर बाह्य रूग्ण विभागात तर १३ रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत एक रूग्ण दगावला आहे. दरम्यान कोरोना रुग्णांची संख्या देखिल वाढली असून आज २६ रुग्णांची भर पडली तर १५जण रोगमुक्त झाले आहेत.
आत्तापर्यंत शहरात एक लाख ९७,७८१जण बाधित सापडले आहेत तर एक लाख ९५,४१६ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. सात रुग्णांवर रुग्णालयात आणि १९१ रुग्णांवर घरी उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २,१६७ रूग्ण कोरोनाने दगावले आहेत.