भारतीय महिलांनी तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत शुक्रवारी झालेला पहिला सामना नऊ विकेट्सने जिंकल्यानंतर, भारतीय चाहत्यांमध्ये, ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध टी-२० मालिका जिंकण्याच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. तथापि, ऑस्ट्रेलियाने रविवारी दुसऱ्या टी-२० मध्ये भारताचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका जिंकण्याच्या विमेन इन ब्लूच्या आशा धुळीस मिळवून मालिका बरोबरीत आणली.
या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना, जो मालिकेचा विजेता ठरवेल, मंगळवारी डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये खेळला जाईल. दोन्ही संघ आपले सर्वोत्तम क्रिकेट खेळायचा निर्धार करतील. हा अंतिम सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे खासकरून भारतासाठी ज्यांनी २०१६ नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकही टी-२० मालिका जिंकलेली नाही.
संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका अहुजा, मिन्नू मणी
ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, जेस जोनासन, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, ग्रेस हॅरिस
टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी एकमेकांविरुद्ध ३३ टी-२० सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने २४ विजयांसह भारतावर आघाडी घेतली आहे. भारतातसुद्धा ऑस्ट्रेलियाने चांगले प्रदर्शन केले आहे कारण त्यांनी १४ टी-२० सामन्यांपैकी ११ जिंकले आहेत. मागील पाच टी-२० सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने चार सामने जिंकून आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
भारत | ऑस्ट्रेलिया | |
आयसीसी टी-२० रँकिंग | ३ | १ |
टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने | ८ | २४ |
भारतात | ३ | ११ |
शेवटच्या पाच टी-२० सामन्यांमध्ये | १ | ४ |
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
दीप्ती शर्मा: या भारतीय अष्टपैलू खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात बॅट आणि चेंडूने मौल्यवान योगदान दिले. मात्र, तिचा प्रयत्न निष्फळ ठरला कारण भारताने तो सामना सहा विकेट्सने आणि एक षटक बाकी असताना गमावला. सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना या डावखुऱ्या फलंदाजाने २७ चेंडूत ३० धावा केल्या आणि त्यादरम्यान १००० टी-२० धावा पूर्ण केल्या. बॉलसह, तिने स्पेलच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकांच्या पहिल्या चेंडूवर विकेट्स पटकावल्या. तिने चार षटकात २२ धावा देऊन दोन गडी बाद केले.
ऋचा घोष: भारताची ही यष्टिरक्षक-फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये चांगली फटकेबाजी करत होती. तिने १९ चेंडूत २३ धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि एक षटकार होते. ती आठव्या ते १५व्या षटकापर्यंत मैदानावर होती आणि तेव्हा तिने काही आकर्षक शॉर्ट्स खेळले. यष्टिरक्षकाची भूमिका निभावत तिने दोन झेल पकडून आणि एक स्टम्पिंग करून एकूण तीन गडी बाद केले.
किम गार्थ: भारताविरुद्धचा पहिला टी-२० खेळायला हुकलेल्या, ऑस्ट्रेलियाच्या या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने दुसऱ्या टी-२० मध्ये तिला मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला. मेगन शुटसोबत नवीन चेंडू शेअर करताना तिने पॉवरप्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली. तिने स्पेलच्या पहिल्या दोन षटकात दोन विकेट्स काढून भारताला बॅकफूटवर टाकले. तिने उत्कृस्ट गती परिवर्तन केले. तिच्या शानदार गोलंदाजीसाठी तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
एलिस पेरी: तिचा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना, या ३३ वर्षीय ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात एक सुंदर षटकार मारून आपल्या संघाला सामना जिंकवून दिला. तिने २१ चेंडूंत नाबाद ३४ धावा केल्या. तिची खेळी तीन चौकार आणि दोन षटकारांनी सजली होती. जेव्हा ऑस्ट्रेलिया गोलंदाजी करत होते तेव्हा तिने दोन झेल पकडले. फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून केलेल्या लक्षणीय योगदानामुळे तिचा ३०० व आंतरराष्ट्रीय सामना अधिक खास झाला.
खेळपट्टी
हे ठिकाण महिलांच्या पाचव्या टी-२० चे (आणि सुरु असलेल्या मालिकेतील तिसऱ्या टी-२० चे) आयोजन करेल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळलेले चार सामने जिंकले आहेत (सुपर ओव्हरने ठरलेल्या एका सामन्याच्या निर्णयासह). संपूर्ण सामन्यात फलंदाजीसाठी परिस्थिती चांगली असेल. अपेक्षेप्रमाणे विपरीत, मागील सामन्यात दव न पडल्यामुळे मैदान कोरडे होते आणि दुसऱ्या डावात गोलानंदजी आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला काही त्रास झाला नाही. त्यामुळे सामन्याचा निर्णय नाणेफेकवर अवलंबून नसेल. या फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर गती परिवर्तन गोलंदाज करणारे गोलंदाज यशस्वी ठरू शकतात.
हवामान
हवामान थोडा उबदार राहण्याची अपेक्षा आहे. संध्याकाळी कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील. १४% ढगांचे आच्छादन असेल. पावसाची शक्यता नाही. दक्षिणेकडून वारे वाहतील.
माइलस्टोन अलर्ट
- एलिसा हिली तिची १५० वी आंतरराष्ट्रीय टी-20 खेळणार आहे
- जेमिमाह रॉड्रिग्जला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ५८ धावांची गरज आहे
- जेस जोनासनला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ४ विकेट्सची गरज आहे
- जॉर्जिया वेरेहॅमला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची गरज आहे
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: ९ जानेवारी २०२४
वेळ: संध्याकाळी ७ वाजता
स्थळ: डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई
प्रसारण: जिओ सिनेमा