२०१६ नंतर पहिल्यांदाच भारतीय महिला क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका जिंकेल?

Photo credits: X/BCCI Women

 

 

२०१६ पासून भारतीय महिलांनी कधीही ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्ध टी-२० मालिका जिंकलेली नाही. सध्या सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० ने आघाडी घेतल्याने, नवी मुंबईतील डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे रविवारी खेळल्या जाणार्‍या दुसऱ्या टी-२० सामन्यात विजय मिळवून भारतीय महिलांकडे मालिका जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.

आत्तापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच टी-२० मालिका खेळल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने चार आणि भारताने एक जिंकला आहे.

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), ऋचा घोष (यष्टीरक्षक), अमनजोत कौर, श्रेयंका पाटील, मन्नत कश्यप, सायका इशाक, रेणुका सिंग ठाकूर, तीतस साधू, पूजा वस्त्रकार, कनिका अहुजा, मिन्नू मणी 

ऑस्ट्रेलिया: एलिसा हिली (कर्णधार आणि यष्टिरक्षक), ताहलिया मॅकग्रा (उपकर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, जेस जोनासन, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, बेथ मूनी (यष्टीरक्षक), एलिस पेरी, मेगन शुट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वेरेहॅम, ग्रेस हॅरिस

 

टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने

भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध ३२ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी ऑस्ट्रेलियाने २३ विजयांसह वर्चस्व राखले आहे, तर भारताने आठ जिंकण्यात यश मिळवले आहे. एक सामना अनिर्णित आहे. भारतीय परिस्थितीतही, ऑस्ट्रेलियाने १३ टी-२० पैकी १० जिंकले आहेत. तथापि, मागील पाच टी-२० पैकी भारताने दोन जिंकून (ज्यामध्ये सध्याच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयाचा समावेश आहे) लढा देण्याचा प्रयत्न केला आहे.

भारत ऑस्ट्रेलिया
आयसीसी टी-२० रँकिंग
टी-२० क्रिकेटमध्ये आमने सामने २३
भारतात १०
शेवटच्या पाच टी-२० सामन्यांमध्ये

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

तीतास साधू: पश्चिम बंगालची ही १९ वर्षीय वेगवान सनसनाटी केवळ तिची पाचवी टी-२० खेळत असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात प्रभावी होती. तिने चार षटकांत १७ धावा देऊन चार गडी बाद केले आणि तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट आकडेवारी नोंदवली. तसेच ही महिलांच्या टी-२० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कोणत्याही भारतीयासाठी दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे (सर्वोत्तम: झुलन गोस्वामी ५/११). केवळ नवीन चेंडूने पॉवरप्लेतच नाही तर अंतिम षटकांमध्येही ती प्रभावी ठरली. या शानदार प्रदर्शनासाठी तिला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

शफाली वर्मा: भारतीय संघातील आणखी एक १९ वर्षीय खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये उत्कृष्ट खेळ केला. शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये संधी न मिळालेल्या या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने सुंदर खेळी करून संघामध्ये आपले स्थान (एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुद्धा) बळकट करण्याचे प्रयत्न केले आहे. तिने ४४ चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ६४ धावा करत तिचे आठवे टी-२०

फीबी लिचफिल्ड: एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून खेळत असलेली ही ऑस्ट्रेलियाची डावखुरी फलंदाज भारताविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायला उतरली. जरी तिच्या फलंदाजीच्या क्रमवारीत बदल झाला असला तरी तिचा फॉर्म कायम होता. तिने ३२ चेंडूत ४९ धावा केल्या. तिचा डाव चार चौकार आणि तीन षटकारांनी सजला होता. त्याचबरोबर तिने एलिस पेरीसोबत पाचव्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली.

एलिस पेरी: ही ऑस्ट्रेलियन दिग्गज अष्टपैलू खेळाडू रविवारी भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० मध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेईल कारण ती तिचा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटू बनणार आहे. पहिल्या टी-२० मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने ३० चेंडूत ३७ धावांची खेळी केली, ज्यात दोन चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश होता. या उजव्या हाताच्या फलंदाजाने पाचव्या ते १९व्या षटकापर्यंत मैदानावर असून डाव सांभाळला.

 

खेळपट्टी

हे ठिकाण तिसऱ्या आंतरराष्ट्रीय महिला टी-२० चे (आणि या सुरु असलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्याचे) आयोजन करेल. तिन्ही सामने दुस-या डावात फलंदाजी करणार्‍या संघांनी जिंकले आहेत (ज्यात एका सुपर ओव्हर ने ठरलेला निर्णय आहे). तसेच, डब्ल्यूपीएल २०२३ मध्ये दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी ११ पैकी आठ सामने जिंकले. नाणेफेक जिंकणारी कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करेल कारण सामन्याच्या दुसऱ्या टप्प्यात दव पडण्याची दाट शक्यता आहे. पहिल्या टी-२० च्या दुस-या डावात लक्षणीय दव पडले होते, ज्यामुळे गोलंदाजांना चेंडू नीट पकडणे अवघड गेले ज्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला झाला.

 

हवामान

हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. २७% ढगांचे आच्छादन आणि १% पावसाची शक्यता असेल. पश्चिम-नैऋत्येकडून वारे वाहतील.

 

माइलस्टोन अलर्ट

  • एलिस पेरी तिचा ३०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे
  • जेमिमाह रॉड्रिग्जला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण करण्यासाठी ७१ धावांची गरज आहे
  • दीप्ती शर्माला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी २९ धावांची गरज आहे
  • जेस जोनासनला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ४ विकेट्सची गरज आहे
  • जॉर्जिया वेरेहॅमला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ५ विकेट्सची गरज आहे

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ७ जानेवारी २०२४

वेळ: संध्याकाळी ७ वाजता

स्थळ: डॉ डी वाय पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई

प्रसारण: जिओ सिनेमा