भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज होणार रोमहर्षक लढत 

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताची न्यूझीलंडशी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ४ ऑक्टोबर रोजी आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीच्या चौथ्या सामन्यात भेट होणार आहे. एकूण खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत जरी न्यूझीलंडने भारतावर वर्चस्व गाजवले असले, तरी टी-२० विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांना समान यश मिळाले आहे.

आमने-सामने 

भारत आणि न्यूझीलंड यांनी एकमेकांविरुद्ध १३ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने चार आणि न्यूझीलंडने नऊ जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात, दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने जिंकले आहेत म्हणूनच त्यांच्यातील ही आजची लढत क्रिकेट रसिकांसाठी रोमहर्षक ठरेल.

 

संघ  

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना

न्यूझीलंड: सोफी डीवाईन (कर्णधार), सुझी बेट्स, ईडन कार्सन, इझी गेज  मॅडी ग्रीन, ब्रुक हॅलिडे, फ्रॅन जोनास, लेह कॅस्परेक, अमिलिया कर, जेस कर, रोझमेरी मायर, मॉली पेनफोल्ड, जॉर्जिया प्लिमर, हॅन्ना रोव, लिया ताहुहू

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे

स्मृती मानधना: भारताच्या या शैलीपूर्ण डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने या वर्षी १४ आंतरराष्ट्रीय टी-२० डावांमध्ये १२३च्या स्ट्राक रेटने आणि ४५च्या सरासरीने ४९५ धावा केल्या आहेत, ज्या भारतीय महिला संघासाठी सर्वाधिक आहेत.

दीप्ती शर्मा: ही डाव्या हाताची मधल्या फळीतील फलंदाज आणि उजव्या हाताची ऑफ स्पिन गोलंदाज जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. या कॅलेंडर वर्षात १६ आंतराष्ट्रीय टी-२० डावात २३ विकेट्स घेत ती भारतासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरली आहे.

अमिलिया कर: न्यूझीलंडची ही धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू या कॅलेंडर वर्षात आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बॅट आणि चेंडू दोन्हीसह प्रभावी ठरली आहे. उजव्या हाताने लेग स्पिन गोलंदाजी करत, तिने १४ विकेट्स घेतल्या आहेत आणि बॅटने १२ डावात २५२ धावा केल्या आहेत.

सुझी बेट्स: न्यूझीलंडच्या या उजव्या हाताच्या सलामीच्या फलंदाजाने १३ आंतराष्ट्रीय टी-२० डावांमध्ये ३१६ धावा केल्या आहेत आणि या कॅलेंडर वर्षात तिच्या संघासाठी ती सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. या माजी न्यूझीलंडच्या कर्णधाराला १६५ आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याचा भरपूर अनुभव आहे.

 

हवामान

हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. तापमान ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ४ ऑक्टोबर २०२४

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार