भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या अंतिम साखळी सामन्यात एकमेकांशी भिडणार आहेत. गतविजेते ऑस्ट्रेलिया याने त्यांचे तीनही साखळी सामने जिंकले आहेत. तर भारताने न्यूझीलंडविरुद्ध खडतर सुरुवात केल्यानंतर, दोन सलग विजयांसह दमदार पुनरागमन केले आहे. उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यास, वूमन इन ब्लू, शारजाह येथे, जिथे हा संघ यापूर्वी खेळला नाही, ऑस्ट्रेलियाला एका करो की मरो सामन्यात सामोरे जातील.
आमने सामने
भारत आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांविरुद्ध ३४ आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत, ज्यापैकी भारताने सात जिंकले आहेत आणि ऑस्ट्रेलियाने २५. टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने ४-२ च्या फरकाने वर्चस्व राखले आहे. परंतु जर फक्त टी-२० विश्वचषकाच्या साखळी टप्प्याचे आकडे पहिले तर भारताकडे २-१ अशी आघाडी आहे.
संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष, यास्तिका भाटिया, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील, सजीवन सजना
ऑस्ट्रेलिया: ॲलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनी, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, ॲनाबेल सदरलँड, टायला व्लामिंक, जॉर्जिया वेअरहॅम
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
हरमनप्रीत कौर: भारताच्या कर्णधाराला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला आवडते. मागील सामन्यात श्रीलंकेविरुद्ध नाबाद ५२ धावांची खेळी केल्यानंतर या उजव्या हाताच्या फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असेल.
अरुंधती रेड्डी: भारताच्या या उजव्या हाताच्या मध्यमगती गोलंदाजाने या विश्वचषकात आतापर्यंत सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले आहे. तिने तिच्या मागील दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या आहेत आणि डावाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये ती चांगली गोलंदाजी करत आहे.
बेथ मुनी: ऑस्ट्रेलियाची ही डावखुरी सलामीवीर या विश्वचषकात तिच्या संघासाठी तीन सामन्यांत ९८ धावा करून आघाडीवर आहे. तिची सरासरी ४९ आहे आणि तिचा स्ट्राइक रेट ११५ चा आहे.
मेगन शुट: ऑस्ट्रेलियाची ही उजव्या हाताची वेगवान सनसनाटी, महिला टी-२० विश्वचषकातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तिने तीन सामन्यांत प्रति षटक फक्त २.१२ च्या इकॉनॉमिने किफायतशीर गोलंदाजी केली आहे. त्याचबरोबर तिच्या नावावर सात विकेट्स देखील आहेत.
हवामान
सुमारे २९ अंश सेल्सिअस तापमानासह, तुलनेने कमी उबदार हवामानाची अपेक्षा करा. आर्द्रता जवळपास ५९% असेल.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १३ ऑक्टोबर, २०२४
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार