ठाण्यात आश्चर्यकारक निकालांची शक्यता
ठाणे: ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवकांच्या पॅनेलमध्ये काही ठिकाणी सरळ तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार असून महापालिकेच्या या बिग फाइटकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत महायुती, महाविकास आघाडीतील मनसे, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये खरी लढत असली तरी बंडखोर अपक्ष उमेदवार देखील चमत्कार घडविण्याची शक्यता आहे.
प्रभाग १ मध्ये शिवसेना शिंदे गटाचे सिद्धार्थ ओवळेकर, अपक्ष रवी घरत आणि ठाकरे गटाचे महेंद्र पाटील यांच्यात लढत होणार आहे. प्रभाग २ मध्ये भाजपाचे मनोहर डुंबरे यांचा सामना मनसेचे रविंद्र मोरे आणि अपक्ष प्रविण नागरे यांच्याशी होणार आहे. प्रभाग ३ येथे चुरशीचा सामना होणार असून माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांची लढत ठाकरे गटाच्या कमल शिर्के आणि ठाणे विकास आघाडीच्या उमेदवारी होणार आहे. प्रभाग ४मध्ये शिवसेनेचे सिद्धार्थ पांडे यांचा सामना अपक्ष नितिन लांडगे तर भाजपाच्या स्नेहा आंब्रे यांचा सामना नुपूर अग्रवाल यांच्याशी होणार आहे. प्रभाग ८ येथे ज्येष्ठ माजी नगरसेवक देवराम भोईर यांच्याशी दोन हात अपक्ष लॉरेन्स डिसोजा हे करणार आहेत. प्रभाग ९मध्ये शिंदे गटाचे उमेश पाटील विरुद्ध राष्ट्रवादी (श. प.)चे अभिजित पवार, प्रभाग १०मध्ये राष्ट्रवादी (अ. प.)चे सुहास देसाई विरुद्ध काँग्रेसचे ॲड. जावेद शेख, प्रभाग १२मध्ये भाजपाच्या माधुरी मेटांगे विरुद्ध मनसेच्या रक्षा मांडवकर, प्रभाग मध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती विरुद्ध शिवाजी खुस्पे, प्रभाग १४मध्ये शिवसेनेचे दिलिप बारटक्के विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे मयूर शिंदे, प्रभाग १५मध्ये भाजपाचे अमित सरय्या विरुद्ध बसपाचे महेंद्र सोडारी, प्रभाग २०मध्ये भाजपाचे भरत चव्हाण विरुद्ध ठाकरे गटाचे राजेश वायाळ, प्रभाग २१मध्ये भाजपाचे सुनेश जोशी विरुद्ध अपक्ष किरण नाकती, प्रभाग २२मध्ये शिवसेना शिंदे गटाचे पवन कदम विरुद्ध अपक्ष विकास दाभाडे, प्रभाग २३मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मनाली पाटील विरुद्ध अपक्ष प्रमिला केणी, प्रभाग २४मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या प्रियांका पाटील विरुद्ध वैशाली खारकर, प्रभाग २५मध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश साळवी विरुद्ध राष्ट्रवादी (श. प.) च्या रिटा यादव, प्रभाग २६ मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध, शरद पवार गटाच्या मनिषा भगत, प्रभाग २८मध्ये शिवसेना शिंदे गटाचे रमाकांत मढवी विरुद्ध ठाकरे गटाचे रोहिदास मुंडे, प्रभाग २९मध्ये शिंदे गटाचे बाबाजी पाटील विरुद्ध शरद पवार गटाचे हिरा पाटील, प्रभाग ३१मध्ये अजित पवार गटाचे राजन किणे विरुद्ध शरद पवार राष्ट्रवादीचे महेंद्र कोमूर्लेकर आणि प्रभाग ३२मध्ये शरद पवार गटाच्या मर्जिया पठाण विरुद्ध अजित पवार गटाच्या असरीन राऊत अशा मुख्य लढती असून मतमोजणीनंतरच कोण सरस ठरला हे स्पष्ट होणार आहे.