अंबरनाथ : शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचा तिसरा दिवस तो गायक कैलास खेर यांच्या गाजलेल्या सुपरहिट गाण्यांमुळे गाजला, त्यांकजी गाणी ऐकायला तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित अंबरनाथला 29 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली.फेस्टिवलचा तिसरा दिवस ‘कैलासा’ने गाजवला.
तौबा तौबा, सैय्या, तेरी दिवानी, बम लहिरी, तेरे नाम से जी लू अशी अनेक गाणी कैलाश खेर यांनी सादर केली. या गाण्यांना अंबरनाथकरांनी तुफान दाद दिली.
मोबाईलचे टॉर्च लावून अंबरनाथकर रसिकांनी कैलाश खेर यांच्या गाण्यांवर अक्षरशः ठेका धरला. तर कैलाश खेर यांची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी स्टेजच्या समोर तरुणाईने मोठी गर्दी केली होती. अंबरनाथकरांनी तिसऱ्या दिवशी पहिल्या दोन दिवसांच्या गर्दीचा विक्रमही मोडीत काढला. आज फेस्टिव्हलच्या संपूर्ण मैदानात उभे राहण्यासाठी सुद्धा जागा शिल्लक नव्हती. तर बाहेरच्या बाजूला सुद्धा लोक उभे राहून एलईडीवर कार्यक्रम पाहत होते. आपण अंबरनाथला दुसऱ्यांदा आलो असून आज अंबरनाथकरांचा तुफान प्रतिसाद अनुभवला, असे कैलाश खेर यांनी सांगितले. तसेच आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल आयोजक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे त्यांनी आभार मानले.

सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच फेस्टिव्हलमध्ये उभारण्यात राममंदिराची प्रतिकृती पाहण्यासाठी, तसेच नामवंत चित्रकारांनी रेखाटलेली चित्र पाहण्यासाठीही अंबरनाथकरांनी गर्दी केली होती.