नवी मुंबई : रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे गव्हर्नर म्हणून हर्ष मकोल यांचे नुकतेच पदग्रहण झाले. या सोहळ्यात जिल्ह्यातील सुमारे पाचशेहून अधिक रोटेरियन, समाजसेवक आणि विविध स्तरातील प्रतिष्ठित मान्यवर सहभागी झाले होते.
रोटरी इंटरनॅशनल डायरेक्टर के. पी. नागेश यांच्या उपस्थितीत झालेल्या पदग्रहण समारंभात मावळते गव्हर्नर दिनेश मेहता यांनी श्री. मकोल यांच्याकडे सूत्रे हवाली केली. रोटरीतर्फे जिल्हाभर सामाजिक उपक्रम राबवले जातील असे सांगून श्री. मकोल यांनी सेवाभावी व्यक्तींनी रोटरी सदस्य व्हावे, असे आवाहन केले.