नौपाडा पोस्ट ऑफिस येथे तिरंगा उपलब्ध
ठाणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत सुरु असलेल्या हर घर तिरंगा अभियानासाठी भारतीय टपाल खात्यातर्फे तिरंगा उपलब्ध करून दिला जात आहे.
ठाणे नौपाडा येथील पोस्ट ऑफिसच्या पोस्ट मास्तर वनिता कुलकर्णी यांनी पत्रकार, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे सदस्य, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे कार्यवाह, राष्ट्रीय मतदाता मंचाचे सदस्य मकरंद मुळे यांना तिरंगा देऊन अभियानाचा आरंभ केला. यावेळी नौपाडा पोस्ट ऑफिसचा कर्मचारी वृंद आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्व नागरिकांसाठी नौपाडा पोस्ट ऑफिस येथे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत फक्त पंचवीस रुपयात तिरंगा विक्रीसाठी उपलब्ध आहे. नागरिकांनी तिरंगा अभियानात सहभागी होऊन राष्ट्रीय ध्वज फडकवावा असे आवाहन यावेळी मकरंद मुळे यांनी केले.