लोकमान्य, शास्त्रीनगरमधील नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
ठाणे: दिवंगत रामचंद्र ठाकूर अर्थात भाऊजी यांनी लोकमान्यनगरचा विकास करताना त्यांनी संपूर्ण लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगरला आपल्या कुटुंबाप्रमाणे सांभाळ केला. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी देखील लोकमान्यनगरचा विकास आपल्या कुटुंबाप्रमाणे केला असून हणमंत जगदाळे हे लोकमान्य आणि शास्त्रीनगरचे कुटुंबप्रमुखच आहेत, अशा भावना या प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसनेचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांच्यासह प्रशांत (राजा) जाधवर, सरिता ठाकूर, वनिता घोगरे हे निवडणूक लढवत असून या प्रभागातील बहुसंख्य नागरिक त्यांच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. दिवंगत रामचंद्र ठाकूर उर्फ भाऊजी यांनी परिसराचा विकास करताना व्यापक दृष्टीकोन ठेऊन विकास केला. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी देखील लोकलमान्य आणि शास्त्रीनगर परिसराचा नियोजित विकास केला आहे.
या परिसराचा विकास करताना हणमंत जगदाळे यांनी केवळ विकास केला नाही तर नागरिकांच्या प्रत्येक सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणी सहभाग घेतला आहे. समस्या कोणत्याही प्रकारची असो, त्यांनी नेहमीच ती समस्या तातडीने सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. घरामध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर घरातील कुटुंब प्रमुखच ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. हणमंत जगदाळे हे लोकमान्य आणि शास्त्रीनगरच्या घराघरात याच भूमिकेत नागरिकांच्या पाठीशी ठाम उभे राहिले, भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.