ठाणे: ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांची शिवसेनेने नियुक्ती केली. तळागाळातील प्रभागातून अनुभवी नगरसेवकाला हे पद दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
माजिवडा ग्रामपंचायत ते ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेता असा प्रवास करणाऱ्या श्री. जगदाळे यांना शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर प्रथमच सभागृह नेते पदाचा बहुमान मिळाला आहे. ठाणे महापालिकेत सहाव्यांदा यश मिळवणारे जगदाळे हे लोकमान्य-शास्त्रीनगर या प्रभाग ६मधून प्रचंड मतांनी विजयी झाले आहेत. महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार त्यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. कष्टकरी, कामगार अशा गोरगरीब मतदारांच्या प्रभागातून निवडून आलो आहे. त्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहराचा विकास पुढील काळात केला जाईल, असे श्री.जगदाळे यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.