ठाणे : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची विक्री करण्यासाठी कंटेनरमधून वाहतूक करणा-या गुन्हेगारांना ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तीन कंटेनरसह कोट्यवधी रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
संबंधित पथकाने अथक परिश्रम घेऊन अशा धंद्याबाबत माहिती मिळवत असताना, 11 फेब्रुवारी 24 रोजी ३.३०च्या सुमारास शामियाना ढाब्याच्या समोरील रस्त्याच्या पलिकडे नाशिक-मुंबई महामार्गावर कांती मोटर्स या दुकानाच्या समोर काही संशयित व्यक्ती दिसल्या. त्यांना हटकल्यानंतर ताहीर सिताबखान (41), मोहन हबीबखान (24) रा.पहाडी राजस्थान आणि जाहूल यासीन हक (37) या कंटेनर चालकांनी त्यांच्या ताब्यातील कंटेनरमध्ये प्रतिबंधित तीन कोटी 55 लाख 14,310 रुपये किंमतीचा प्रीमियम राज निवास सुगंधित पानमसाला व प्रीमियम झेड विक्रीसाठी आणला होता.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ठाणे ग्रामीणचे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. ‘ठाणे ग्रामीण’चे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पोलीस हवालदार उमेश ठाकरे, हनुमंत गायकवाड, भगवान सोनवणे, सुहास सोनवणे, हेमंत विभूते, धनाजी कडव, संतोष सुर्वे आणि पोलीस नाईक जितेंद्र वारके व योगेश शेळकंदे, स्वप्निल बोडके यांच्या पथकाने केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर जाधव (स्थानिक गुन्हे शाखा) हे करत आहेत.