नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपात कोकण भवनातील जुनी पेन्शन हक्क समितीतील तृत्तीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी काम बंद संपाच्या पहिल्याच दिवशी 100 टक्के सहभागी होऊन बेमुदत संप यशस्वी केला.
कोकण भवनातील सर्व विभागातील जुनी पेन्शन हक्क समितीतील तृत्तीय व चतुर्थ श्रेणी कर्मऱ्यानी काम बंद बेमुदत संपात सहभागी झाल्याने कामानिमित्त कोकण भवनात येणाऱ्या अभ्यागताची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. बृन्हमुंबई राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस मोरेश्वर चौधरी, उपाध्यक्ष अस्मिता जोशी महिला संघटक मंगला कुलकर्णी, जुनी पेन्शन हक्क समिती कोंकण विभागाच्या अध्यक्ष वंदना कोचुरे, कार्याध्यक्ष माधुरी डोंगरे, उपाध्यक्षा अश्विनी धुमाळ, सचिव अजित न्यायनिरगुने, सचिव अर्पणा गायकवाड, कोषाध्यक्ष विनोद वैदु, विद्युत विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकात पवार, वर्ग 4 च्या विभागीय उपाध्यक्षा जनाबाई साळवे तसेच सदस्य नरेश वाघमारे, श्याम लगाडे, आदीनी संप यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.