मुख्यमंत्र्यांना सोन्याचा धनुष्यबाण भेट

अंबरनाथ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अंबरनाथच्या माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांनी सोन्याचा धनुष्यबाण भेट दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांना माजी नगराध्यक्षा आणि युवती सेना राज्य कार्यकारिणी सदस्या प्रज्ञा बनसोडे यांनी एक तोळे वजनाचा सोन्याचा धनुष्यबाण भेट दिला.

मुंबईत झालेल्या शिवसेनेच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर प्रज्ञा  बनसोडे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना  धनुष्यबाण भेट दिला. हिंदुत्त्वाचा वारसा चालवणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांना  धनुष्यबाण चिन्ह मिळणे  हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असून तो संस्मरणीय ठरण्यासाठी त्यांना सोन्याचा धनुष्यबाण दिल्याचे माजी नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांनी सांगितले.