यूपी वॉरियर्सचा WPL २०२५मध्ये प्रवास गुजरात जायंट्स विरुद्धच्या लढतीने सुरु

दीप्ती शर्मा या नवीन कर्णधाराखाली, यूपी वॉरियर्सचा वूमन्स प्रीमियर लीग (WPL) २०२५चा पहिला सामना रविवारी वडोदरा येथील कोटांबी स्टेडियमवर खेळला जाईल. त्यांचा सामना गुजरात जायंट्सशी होणार आहे, ज्यांना शुक्रवारी स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. २०१ धावांचा बचाव करू शकले नाहीत ते गुजरात जायंट्स.

 

आमने-सामने

गुजरात जायंट्सविरुद्ध चार पैकी तीन सामने जिंकून यूपी वॉरियर्सने आमने-सामने लढतीत वर्चस्व राखले आहे.

 

संघ

यूपी वॉरियर्स: शिनेल हेन्री, अंजली सरवानी, दीप्ती शर्मा (कर्णधार), ग्रेस हॅरिस, किरण नवगिरे, चामरी अथापथू, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सेहरावत, सोफी एकलस्टन, ताहलिया मॅकग्रा, व्रिन्दा दिनेश, पूनम खेमनार, साईमा ठाकोर, गौहर सुलताना, क्रांती गौड, आरुषी गोयल, अलाना किंग

गुजरात जायंट्स: ॲश्ले गार्डनर (कर्णधार), बेथ मुनी (यष्टीरक्षक), दयालन हेमलथा, हरलीन देओल, लॉरा वूल्फार्ट, शबनम शकील, तनुजा कंवर, फिबी लिचफिल्ड, मेघना सिंग, काशवी गौतम, प्रिया मिश्रा, मन्नत कश्यप, सायली सातघरे, सिमरन शेख, डिआंड्रा डॉटीन, प्रकाशिका नाईक, डॅनिअल गिब्सन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

ग्रेस हॅरिस: ऑस्ट्रेलियाची ही धडाकेबाज फलंदाज यूपी वॉरियर्ससाठी सर्वाधिक धावा (एलीसा हिलीच्या अनुपस्थितीत) करणारी फलंदाज आहे. १५१ च्या जबरदस्त स्ट्राइक रेटने १३ डावात ४१८ धावा ठोकलेली ही खेळाडू कधीही सामन्याची दिशा आणि दशा बदलू शकते.

दीप्ती शर्मा: यूपी वॉरियर्सच्या नवीन कर्णधाराकडून बऱ्याच अपेक्षा असतील कारण तिचा संघ WPL च्या पहिल्या दोन हंगामात प्ले-ऑफसाठी पात्र ठरला नव्हता. बॅट आणि चेंडूने तिचे योगदान महत्त्वाचे असेल. ती एक प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू आहे जिच्या नावावर WPLमध्ये ३८५ धावा आणि १९ विकेट्स आहेत.

ॲश्ले गार्डनर: गुजरात जायंट्सच्या नवनियुक्त कर्णधाराने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध WPL २०२५च्या पहिल्या सामन्यात जादूई कामगिरी केली. या उजव्या हाताच्या फलंदाजाने ३७ चेंडूत नाबाद ७९ धावा झळकावल्या आणि नंतर ऑफ स्पिन गोलंदाजी करून तिच्या स्पेलच्या पहिल्याच षटकात दोन विकेट्स पटलावल्या.

बेथ मूनी: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध WPL २०२५च्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सच्या या शानदार सलामीवीराने अस्खलित अर्धशतक रचले. तिची खेळीत आठ चौकारांचा समावेश होता.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: फेब्रुवारी १६, २०२५

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

ठिकाण: कोटंबी स्टेडियम, वडोदरा

प्रक्षेपण: जिओहॉटस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क