ठाणे : नुकत्याच महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांना मदत म्हणून पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र प्रभुदेसाई आणि उपाध्यक्ष परीक्षित प्रभुदेसाई यांच्या हस्ते पाच लाख रुपयांचा धनादेश रा. स्व. संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत कोषाध्यक्ष प्रदीप पराडकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
पितांबरी उद्योग समूह नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत नैसर्गिक आपत्तीच्या काळात मदतीचा हात पुढे करते. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. यावेळी कै. वामनराव ओक रक्तकेंद्राचे अध्यक्ष किरण वैद्य, जनकल्याण समितीचे सदस्य वीरेंद्र पाटील आणि पितांबरीचे माधव पुजारी उपस्थित होते. व्यवसायाच्या स्थापनेपासून पितांबरी उद्योग सामाजिक बांधिलकी जपत आहे, आपल्या उत्पन्नातील भाग कर्तव्य भावनेने देत आहे.