माजी नगरसेवकावर कोयत्याने हल्ला

​उल्हासनगर: उल्हासनगर येथे काँग्रेसचे माजी नगरसेवक तुलसी वसिटा यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी अजय बागुल याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

​माजी नगरसेवक वसिटा मंगळवारी सायंकाळी हे श्रीराम चौकात उभे असताना बागुलसोबत त्यांचा शाब्दिक वाद झाला. यावेळी, बागुलने आपल्या कमरेचा कोयता काढून वसिटा यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र वसिटा यांनी स्वतःचा बचाव केल्यामुळे ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.

​या घटनेनंतर वसिटा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अजय बागुल विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, शिवीगाळ आणि धमकावणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.