ठाणेवैभव आणि क्रिएटिव्ह स्माईल यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे: नाताळाच्या निमित्ताने ठाणेवैभव आणि क्रिएटिव्ह स्माईल यांच्या संयुक्त विद्यमाने नाताळ ग्रीटिंग कार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली.
यावेळी क्रिएटिव्ह स्माईलच्या डॉ. प्रीती कुलकर्णी यांनी स्माईल करेक्शन या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले. दात सरळ असण्याचे फायदे यानिमित्ताने डॉ. कुलकर्णी यांनी पटवून दिले.
या उपक्रमात सी.पी. गोएंका इंटरनॅशनल शाळेने भाग घेतला. 350 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिला माडीवाले यांच्या नेतृत्वाखाली चांगले संदेश देणारे ग्रीटिंग कार्ड साकारले. या वेळेस ठाणेवैभवचे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी या स्पर्धेचे आयोजन पाहिले तर सी.पी. गोएंकाच्या समन्वयक राधिका कार्तिक आणि चित्रकला शिक्षक नितीन अगरवाल यांनी विशेष मेहनत घेतली. परीक्षक म्हणून वरिष्ठ चित्रकला शिक्षक सदाशिव कुलकर्णी आणि कलाशिक्षक नीता हजारे यांनी काम पाहिले