इंग्लंड आणि नेदरलँड्समध्ये होणार अभिमानासाठी लढाई

Photo credits: AP & AP/Rafiq Maqbool

८ नोव्हेंबर रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या ४० व्या सामन्यात इंग्लंड आणि नेदरलँड्स या दोन युरोपीय राष्ट्रांमध्ये लढत होणार आहे.

दोन्ही संघांना गेल्या एका महिन्यात आनंदी होण्याची फारशी संधी मिळाली नाही कारण बर्‍याच गोष्टी त्यांच्या मनासारख्या झाल्या नाहीत. त्यांनी गुणतालिकेच्या तळाशी जणूकाही आपले घरच बांधले आहे. एकीकडे नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला ३८ धावांनी पराभूत करून धक्का दिला, तर दुसरीकडे इंग्लंडने त्यांच्या अनपेक्षित निराशाजनक कामगिरीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 इंग्लंड आणि नेदरलँड्स एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

इंग्लंड आणि नेदरलँड्सने १९९६ ते २०२२ दरम्यान एकमेकांविरुद्ध सहा एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि ते सर्व इंग्लंडने जिंकले आहेत. भारतात, त्यांनी फक्त एक एकदिवसीय सामना खेळला ज्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवला. विश्वचषकात, ते तीनदा (१९९६, २००३ आणि २०११) भेटले आणि सर्व सामन्यांमध्ये इंग्लंडने नेदरलँड्सला मात दिली.

  इंग्लंड नेदरलँड्स
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) १४
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
भारतात
विश्वचषकात

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील इंग्लंड आणि नेदरलँड्सची आतापर्यंतची कामगिरी

इंग्लंड आणि नेदरलँड्स आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला आठवा सामना खेळतील. सात सामन्यांपैकी इंग्लंडला फक्त एकच विजय मिळवता आला, जी एक अत्यंत धक्कादायक बाब आहे. नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला हरवून दोन सामने जिंकले. हे दोन्ही संघ गुणतालिकेत शेवटच्या दोन स्थानांवर आहेत.

सामना क्रमांक इंग्लंड नेदरलँड्स
न्यूझीलंडकडून ९ विकेटने पराभव पाकिस्तानकडून ८१ धावांनी पराभव
बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव न्यूझीलंडकडून ९९ धावांनी पराभव
अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी पराभव दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून २२९ धावांनी पराभव श्रीलंकेकडून ५ विकेटने पराभव
श्रीलंकेकडून ८ विकेटने पराभव ऑस्ट्रेलियाकडून ३०९ धावांनी पराभव
भारताकडून १०० धावांनी पराभव बांगलादेशचा ८७ धावांनी पराभव
ऑस्ट्रेलियाकडून ३३ धावांनी पराभव अफगाणिस्तानकडून ७ विकेटने पराभव

 

संघ

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियम लिव्हिंगस्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

नेदरलँड्स: स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), मॅक्स ओ’डॉड, बास दे लीड, विक्रम सिंग, तेजा निदामानुरु, पॉल व्हॅन मीकरेन, कॉलिन अकरमन, रोएलॉफ व्हॅन डर मर्व, लोगन व्हॅन बीक, आर्यन दत्त, रायन क्लाईन, वेस्ली बॅरेसी, साकिब झुल्फिकर, शरीझ अहमद, सायब्रँड एंजेलब्रेक्ट.

  

दुखापती अपडेट्स

इंग्लंड आणि नेदरलँड्ससाठी दुखापतींची चिंता नाही.

 

खेळण्याची परिस्थिती

पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. या स्पर्धेतील चौथा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. येथे सर्वाधिक धावसंख्या आहे ३५७ आणि सर्वात कमी आहे १६७. फलंदाजीसाठी अनुकूल परिस्थितीची अपेक्षा करा.

 

हवामान

हवामान आल्हाददायक राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता नसताना ढगांचे आच्छादन ३४% असेल. वारा पूर्वेकडून वाहेल.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

डेविड मलान: इंग्लंडचा डावखुरा सलामीवीर फलंदाजी विभागात आपल्या संघासाठी लढत देणारा एकमेव योद्धा ठरला आहे. त्याने सात सामन्यांमध्ये ४१ च्या सरासरीने आणि १०० च्या स्ट्राइक रेटने २८६ धावा ठोकल्या आहेत.

आदिल रशीद: या इंग्लंडच्या लेग स्पिनरने सात सामन्यांत पाचहून कमी धावांच्या इकॉनॉमीने गोलंदाजी करत १० विकेट्स घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यानी भारतीय परिस्थितीचा चांगला उपयोग करून यश मिळवले आहे.

सायब्रँड एंजेलब्रेक्ट: आपला पहिला विश्वचषक खेळताना, नेदरलँड्सच्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने सहा सामन्यांमध्ये ३७ च्या सरासरीने आणि ६९ च्या स्ट्राइक रेटने २२२ धावा केल्या आहेत. तो त्याच्या संघासाठी या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

बास दे लीड: सात सामन्यांमध्ये ११ विकेटसह, हा डच अष्टपैलू त्याच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्‍याच्‍या नावावर ११७ धावा सुद्धा आहेत, ज्यात ६७ धावांचा सर्वोत्‍तम स्कोरचा समावेश आहे.

 

आकड्यांचा खेळ

  • जो रूटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६५०० धावा पूर्ण करण्यासाठी ६६ धावांची गरज आहे आणि विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी ५४ धावांची आवश्यकता आहे
  • जोस बटलरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ७१ धावांची गरज आहे.
  • जो रूट आणि जोस बटलर त्यांचा २५वा विश्वचषक सामना खेळतील आणि जेम्स अँडरसन आणि अॅलेक स्टीवर्ट ज्यांनी विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक सामने खेळले त्यांची बरोबरी करतील.
  • ख्रिस वोक्सला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ३१ धावांची गरज आहे आणि विश्वचषकात इंग्लंडकडून सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या इयन बॉथमची (३०) बरोबरी करण्यासाठी १ विकेटची आवश्यकता आहे.
  • आदिल रशीदला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ६ विकेट्सची गरज आहे.
  • डेव्हिड विलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ५ विकेट्सची आवश्यकता आहे.
  • लोगन व्हॅन बीकला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ६ विकेट्सची आवश्यकता आहे.
  • स्कॉट एडवर्ड्सला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ८४ धावांची गरज आहे.

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख:  ८ नोव्हेंबर २०२३

वेळ: दुपारी २:०० वाजता

स्थळ: महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)