स्कॉटलंडवर मात करून इंग्लंड विजयाची हॅट्ट्रिक पटकावणार?

इंग्लंड आणि स्कॉटलंड हे दोन युरोपीय देश रविवारी पहिल्यांदाच एकमेकांविरुद्ध आंतराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहेत. आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील हा १७वा सामना शारजाह येथे खेळवला जाणार आहे. विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या स्कॉटलंड यांची मोहीम कागदोपत्री पूर्ण झाली आहे कारण त्यांना त्यांच्या तीन साखळी सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. परंतु २००९ चे टी-२० विश्वचषक विजेते इंग्लंड यांना उपांत्य फेरीसाठी पात्र होण्याची अजूनही संधी आहे. इंग्लंडने आतापर्यंत या स्पर्धेत दोन पैकी दोन सामने जिंकले आहेत.

आमने सामने

इंग्लंड आणि स्कॉटलंड एकमेकांविरुद्ध पहिला आंतराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहेत.

 संघ

इंग्लंड: हेदर नाइट (कर्णधार), डॅनी वायट-हॉज, सोफिया डंकले, नॅटली सिव्हर-ब्रंट, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स, सोफी एकलस्टन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माइया बुशेर, लिनसे स्मिथ, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन, बेस हीथ

स्कॉटलंड: कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस, लोर्ना जॅक-ब्राउन, अब्बी एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लोई एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हॅना रेनी, रेचेल स्लेटर, कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल

 कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

नॅटली सिव्हरब्रंट: इंग्लंडच्या या चमकदार अष्टपैलू खेळाडूने तिच्या मागील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगला खेळी केली होती. तिने ३६ चेंडूत अर्धा डझन चौकारांसह नाबाद ४८ धावा झळकावल्या. तसेच तिने इंग्लंडसाठी गोलंदाजीची सुरुवात केली आणि संघाच्या फिरकी चौकडीला चांगली साथ दिली.

सोफी एकलस्टन: ही जगातील अव्वल क्रमांकाची टी-२० गोलंदाज या विश्वचषकात प्रभावी ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात तिने दोन विकेट्स घेतल्या आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला.

सारा ब्रायस: स्कॉटलंडची ही यष्टिरक्षक-फलंदाज तिच्या संघासाठी या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिने तीन सामन्यांत ५६ धावा केल्या आहेत. यष्टींमागेसुद्धा तिने दोन स्टंपिंग्ज करून चांगले प्रदर्शन दिले आहे.

ऑलिव्हिया बेल: स्कॉटलंडची ही उजव्या हाताची ऑफस्पिनर या विश्वचषकात तिच्या संघासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी गोलंदाज आहे. तिने आतापर्यंत तीन सामन्यांत चार विकेट्स पटकावल्या आहेत. प्रति षटक सात धावांपेक्षा कमी अशी तिची इकॉनॉमी राहिली आहे.

हवामान

तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील ज्यामुळे हवामान उबदार होईल. खूप सूर्यप्रकाश असेल. आर्द्रता सुमारे ३४% असण्याची अपेक्षा आहे.

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १३ ऑक्टोबर, २०२४

वेळ: दुपारी ३:३० वाजता

स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार