शिक्षण- समानतेचा मार्ग

‘शिका, संघटि त व्हा आणि संघर्ष करा’ असा त्रि सूत्री मंत्र भारतीय समाजाला देणारे महान व्यक्तिमत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे समाज परिवर्तनाचे
प्रभावी साधन मानले. शिक्षणामुळे माणसात हक्क आणि कर्त व्याची जाणीव निर्मा ण होते, म्हणूनच डॉ. आंबेडकरांनी ‘शिक्ष ण हे वाघि णीचे दूध आहे, जो पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ असे सांगून शिक्ष ण हाच समता, स्वातंत्र्य आणि बंधुता मिळवण्याचा एकमेव मार्ग असल्याचे प्रतिप ादन केले. भारतीय संवि धानाच्या
निर्मि तीत त्यांनी समानतेचे तत्त्व दृढपणे रुजवले. त्यांच्या कार्या मुळे समाजातील दर्बु ल घटकांना नवे अधि कार मिळाले. शिक्ष णाच्या प्रसारामुळे समाजात जागृती निर्माण झाली. सामाजि क आणि आर्थि क समानतेत वाढ झाली. अलि कडच्या काळातील याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारताच्या पहिल्या आदि वासी महिला राष्ट्रप ती माननीय द्रौप दी मुर्मू . साध्या गरीब कु टुबं ात जन्म घेऊनही आपला आर्थि क स्तर, जात, लि गं हे काहीही आड येऊ न देता आपल्या कर्तृत्वाच्या आणि शिक्ष णाच्या बळावर
देशाचे सर्वोच्च पद भूषवणारे हे व्यक्तिमत्त्व पाहिले की सर्व प्रकारचे भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करण्याचा शिक्ष ण हाच उत्तम मार्ग असल्याची खात्री पटते.

शिक्ष णातून समानतेचे मूल्य अगदी सहजपणे समाजमानसात रुजत जाते. याची सुरुवात होते ती अगदी शालेय शिक्ष णापासून! समाजातील सर्व स्तरांतील मुले एका गणवेशात शाळेत येतात, सामूहिक प्रा रन्थ ा म्हणतात, एकत्र कवायत करतात, खेळ खेळतात, एकत्र येऊन एखादा प्रकल्प कि ंवा कार्यक्र म यशस्वी करतात.
यातून वर्ण, जात, लि गं , आर्थि क स्तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन माणसाकडे ‘माणूस’ म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन वि द्यार्थ्यांमध्ये वि कसि त होतो.

शिक्ष णाच्या रथात बसून समानतेच्या मार्गा वर वाटचाल करत भारतीय समाजाने मोठा पल्ला गाठला आहे, हे जरी खरे असले तरीही अजूनही समाजातून विष मता समूळ नष्ट झालेली नाही. शहरांमध्ये टोलेजंग इमारती आणि मूलभूत सुवि धाही नसलेल्या झोपडपट्ट या एकाच ठि काणी दि सतात. आजही काही घटक शिक्ष णापासून वंचित राहिलेले दि सतात. शिक्ष ण या प्रभावी साधनाचा प्रसार करून समानतेच्या मार्गा वर पुढील वाटचाल यशस्वी करण्याची जबाबदारी आपल्याप ैकी प्रत्येकाची आहे.
समानतेचे मूल्य रुजविण्या शिक्ष ण हाच मार्ग खरा शिक्ष णाची ज्योत पेटव ून प्रगतीची रे वाट धरा !

-श्रीमती अन्वया काणे, मराठी विषय शिक्षि का, पार्ले टिळक
विद्याल य इंग्लिश मिडि यम स्कूल