राज्यातील विद्यमान सरकार काम करीत नाही अशी टीका विरोधी पक्षांनी के ली तर त्यामागे राजकारण आहे, असे आपण म्हणू शकू . परंतु असा अभिप्राय जनतेकडून आला तर त्याची गंभीर दखल घ्यावी लागेल. मंत्रालयात आपल्या कामाची दाद मागायला गेलेल्या तीन नागरिकांनी आत्महत्या करण्याचे प्रयत्न के ले आणि त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे सरकारच्या कार्यक्षमतेचा विषय ऐरणीवर आला आहे. मंत्रालयात हजारो लोक दररोज त्यांचे गाऱ्हाणे घेऊन येत असतात. त्यापैकी सर्वांची कामे होतातच असे नाही. त्यापैकी काही कामे कायद्याच्या चौकटीत बसणारीही नसतात. त्यामुळे ती झाली नाही तर अधिकाऱ्यांना संशयाचा फायदा द्यावा लागेल. परंतु ज्यांची कामे न्याय्य असतात त्यांच्या वाट्याला अपेक्षाभंग आला तर ते टोकाचे पाऊल उचलू शकतात. असे प्रकार मंत्रालयात नवीन नाहीत. सरकार दरबारी काम व्हायलाच पाहिजे, अशी भूमिका घेण्यात गैर नाही. विशेषतः राज्यातील कोणत्यातरी कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांचे काम जेव्हा जिल्हा मुख्यालयात होत नाही तेव्हाच ते मंत्रालयाकडे येत असतात. म्हणजे त्यांचा संयम संपून बराच काळ उलटला असतो आणि मंत्रालयातही तोच अनुभव आला तर ते विमनस्क अवस्थेत जीवाचे बरे-वाईट कमी करण्यासाठी मागेपुढे पहात नसतात. त्यासाठी मंत्रालयात अशा कृ त्यांना निर्बंध घालण्यासाठी कायमस्वरूपी जाळी लावण्यात आली आहे. परंतु तरीही हा दर्ुदैवी प्रकार घडला आहेच. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या निमित्त सुरु असलेल्या राजकीय घडामोडी थांबायचे नाव घेत
नाही. त्यामुळे लोकहीतापेक्षा राजकारणाला अग्रक्रम प्राप्त झाला आहे. मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांमध्ये प्रामुख्याने दोन प्रकारची माणसे असतात. एक खरोखरीच
अडलीनडलेली माणसे आणि दसरी म्हणजे नव् ु या मंत्र्यांशी असलेल्या जुन्या संबंधातून उखळ पांढरे करून घेणारे ! सत्तेच्या गंगेत आपणही हात धुऊन घ्यावेत
या विचाराने आलेले लोक काम झाले नाही म्हणून आत्महत्या अजिबात करीत नसतात. त्यांच्यासाठी असे हेलपाटे मारणे ही गुंतवणूक असते. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली अशी गाजराची पुंगी असते या मंडळींसाठी मंत्र्यांना भेटणे आणि त्यांच्याकडून काम करून घेणे. वाताहात होत असते ती पहिल्या वर्गात मोडणाऱ्या लोकांची. ते पोटाला चिमटा काढून मंत्रालयात येत असतात. मंत्री वा अधिकारी भेटत नाही तोवर बिच्चारे डोळ्यात प्राण आणून प्रशासकीय हालचाली पहात असतात. संध्याकाळ होईपर्यंत आणि मंत्रालयाचे दरवाजे बंद होईस्तो त्यांच्यावर ‘कृ पाकटाक्ष’ पडत नाही. अनेकांच्या पोटात दिवसभर अन्नाचा कणही गेलेला नसतो आणि रात्रही मंत्रालयाबाहेरील पदपथावर रिकाम्या पोटीच काढावी लागत असते. आत्महत्या करण्याचे विचार अशा लोकांच्या मनात आले नाहीत तरच नवल. मंत्रालयात येणाऱ्या लोकांवर आवर घालण्यासाठी मंत्रालयात अधिकारी आणि मंत्र्यांच्या दालनाबाहेर म्हणे फलक लावण्यात येणार आहे. त्यामुळे निदान ताटकळत बसण्याची पाळी तरी नागरिकांवर येणार नाही. इतका उदात्त विचार होणे चांगलेच आहे. परंतु गर्दीच इतकी असते की फलकावरील वेळ कमी पडावी आणि नेमक्या ठरलेल्या दिवशी मंत्री वा अधिकारी तातडीने अन्य ‘लोकहिता’च्या कामासाठी गेले तर? आम्हाला असे वाटते फलक, जाळी वगैरे उपाय हे चांगल्या कारभाराचे द्योतक ठरू शकत नाही. त्याऐवजी नागरिकांबद्दल खरी तळमळ आणि सचो्टीचीच माणस लागतील. कोणीतरी आपल्या अंगणात येऊन जीव देतो यामुळे संबंधित मंडळी अस्वस्थ झाली असतील तर कारभार सुधारण्याची आशा ठेवता येईल.