बहुमजली अग्निप्रलय

टोलेजंग इमारती ही शहरांची ओळख बनत चालली आहे. या उंच इमारती जणू देशाच्या प्रगतीच्या आलेखाचे प्रतिकात्मक रुप आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. जमिनीची कमतरता आणि शहरीकरणाचा वेग यामुळे वाढत्या मागणीला सामावून घेण्यासाठी नियोजनकर्ते चटई-क्षेत्र निर्देशांकाची चौकट सैल करू लागले आणि मग आकाशाला भिडण्यासाठी जणू एकच स्पर्धा सुरू झाली. एकीकडे घरकु लाचा प्रश्न सुटत असताना अशा उंच इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येत असतो. हाँगकाँगमधील एका बहुमजली इमारतीच्या संकु लात लागलेल्या आगीत तब्बल ८३ जण मृत्यूमुखी पडले असून २८० पेक्षा अधिक नागरिक बेपत्ता आहेत. हाँगकाँग सारख्या प्रगत शहरात जिथे की सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोरपणे पालन होते तिथे अशी भीषण दर्घ ु टना घडावी याचे आश्चर्य वाटते. आपल्या देशात सुरक्षिततेबाबत एकूणच आनंद असल्यामुळे या दर्घ ु टनेतून आपण बरेच काही शिकायला हवे. या अग्निप्रलयाची कारणमीमांसा करताना प्राथमिकदृष्ट्या काही आक्षेपार्हत्रुटी संबंधितांकडून झाल्याचे उघडकीस आले आहे. या संकुलात नुतनीकरणाचे काम सुरू होते. त्यासाठी बांबूची परात बांधण्यात आली होती. तसेच लिफ्ट-लॉबीच्या खिडक्या बंद करण्यासाठी पॉलीयुरेथेन फोमचा वापर करण्यात आला होता. या दोन्ही ज्वलनशील घटकांमुळे आग वेगाने पसरली. अग्निरोधक मानकांची पूर्तता करण्यात आली नसल्याचेही आढळले. परिणामी ८३ लोकांना नाहक जीव गमवावा लागला. दर हाँ ू गकाँगमध्ये ही दर्घ ु टना घडली त्याची आपण इतकी दखल का घ्यावी हा भारतीय मानसिकतेचा सुलभ विचार अनेकांच्या डोक्यात येणे स्वाभाविक आहे. परंतु दर्घ ु टना ही कुठेही आणि केव्हाही घडू शकते. ती गरीब-श्रीमंत, जात-धर्म, प्रगत-मागास वगैरे भेद मानत नसते. त्यामुळे प्रत्येक दर्घ ु टना एक धडा शिकवत असते, शिकणे आणि योग्य ती खबरदारी घेणे हे सुज्ञपणाचे ठरेल. ठाणे-मुंबई परिसरात ५० ते ७० मजल्यांपर्यंत बांधकामे होऊ लागली आहेत. या इमारतींच्या बांधकामात वास्वितूशारद ते स्थापत्यशास्त्रातील निष्णात तज्ज्ञ योग्य ती काळजी घेत अशा इमारती भूकं प-प्रवण आणि सर्व प्रकारची झीज सहन करुन किमान ५० वर्षे टिकतील अशा बांधल्या जातात. दर्ुदैवाने अग्निशमनाबाबतीत मात्र
क्वचितच सर्व निकषांचे काटेकोरपणे पालन होताना दिसते. यामागे अग्निशमन विभागातील भ्रष्टाचार हे प्रमुख कारण असले तरी या खात्यातील कर्मचाऱ्यांना बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या नवीन साहित्याच्या त्यांच्या गुणधर्मासह माहिती असतेच असे नाही. त्यांना प्रशिक्षण दिले जात असते ते आग विझवण्याचे आणि आगीत अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढण्याचे. कोणते साहित्य ज्वालाग्रही आहे हे त्यांना ठाऊक असते का याबाबत शंका आहे. हाँगकाँगच्या दुर्घटनेनंतर भारतातील अग्निशमन विभाग आणि शहर नियोजनकर्ते योग्य काळजी घेतील ही अपेक्षा आहे.