थट्टेच्या पलिकडे

राजकारणात येण्यासाठी आणि पुढे टिकू न राहण्यासाठी काही किमान अहर्ता असाव असे या क्षेत्राचा घसरणारा दर्जा पाहून वारंवार बोलले जात असते. राजकारण्यांच्या हातून जनतेचे हीत सांभाळले जावे हा त्यामागील प्रमुख हेतू असला तरी राहुल गांधी यांच्यावर आलेली नौबत पहाता किमान समज आणि आपल्या प्रत्येक कृ तीचे परिणाम यांची जाणीव नेत्याला असावी हे मात्र म्हणता येऊ शके ल. नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करताना राहुल गांधींनी के लेले विधान त्यांच्या भलतेच अंगलट आले असून त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा दरगामी ू परिणाम होऊ शकतो. नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे. त्यात कोणाचे दमत असायचे कारण ु नाही. परंतु पंतप्रधानपदी विराजमान असणाऱ्या व्यक्तीवर टीका करताना मुद्दे, भाषा, टायमिंग, राजकीय पडसाद आदींचा विचार होणे तितके च अगत्याचे असते. राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस मोठ्या आशेने पहात असताना, खास करून भारत -जोडो यात्रेमुळे त्यांच्या प्रतिमा-संवर्धनेचे काम सुरु झाले असताना, त्यांनी अधिक परिपक्वपणे बोलणे अभिप्रेत होते. अर्थात जे प्रकरण त्यांना भोवले आहे ते ‘भारत – जोडो’ पूर्वीचे आहे. त्यावेळच्या परिपक्वतेत आज लक्षणीय बदल होत असताना आणि काँग्रेसला मरगळ झटकण्यासाठी त्याचा उपयोग होण्याची शक्यता निर्माण झाली असताना त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. त्यामागे राजकारण असल्याचा
पहिला बचाव होईल. परंतु राजकारणात मुत्सद्दीपणा नसेल तर अशा चुका होत राहतात आणि बचाव करण्याची नौबत येते. राहुल गांधी यांच्या बाबतीत नेमके हे घडले आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल या कठोर कारवाईमुळे सहानुभूती निर्माण होऊ शकते. पण ज्यांना इतिहास माहित आहे ते पुन्हा राहुल यांच्या अपरिपक्वतेला दोष देतील. 10 जुलै 2013 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार दोन वर्षांची शिक्षा सुनावल्या गेलेल्या लोकप्रतिनिधीची खासदारकी अथवा आमदारकी रद्द होऊ शकते. हा निकाल लोकप्रतिनिधींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणेल आणि तो रद्दबातल करावा असा ठराव डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना संयुक्त
पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांनी एकमताने घेतला होता. हा निर्णय पत्रकार परिषदेत राहुल यांनी चक्क फाडून टाकला होता आणि अशा संरक्षणाची लोकप्रतिनिधींना गरज नाही अशी भूमिकाही घेतली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहिला आणि तोच राहुल गांधी यांच्या राशीला आला आहे. राजकारणाचा अनुभव असला की त्याचा परिणाम नेत्याच्या मानसिकतेवर, प्रगल्भतेवर होतो. राहुल गांधी यांची भाजपाने खूप थट्टा के ली होती, परंतु खासदारकी रद्द होणे हा थट्टेपलिकडचा विषय आहे. तो काँग्रेसला क्रूर वाटला तर नवल नाही.