हैदराबाद येथे एका चार वर्षाच्या लहानग्याला भटक्या कुत्र्यांनी घेरले आणि त्याला रक्तबंबाळ केले आणि त्यातच त्याचा दर्ुदैवी मृत्यू झाला. हातात खाऊ घेऊन चाललेल्या या चिमुरड्याचे लचके तोडले गेले आणि रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच त्याने प्राण सोडला. ही हृदयद्रावक घटना वाचूनही भटक्या कु त्र्यांवर प्रेमाचा अतिरेक करणाऱ्या मंडळींना त्रास होत नसेल तर त्यांच्या संवेदनांबाबत प्रश्नचिन्ह उभे राहू शकते. भटक्या कु त्र्यांचा उपद्रव हा सातत्याने वादाचा विषय होत असतो. कु त्र्यांनाही जगण्याचा अधिकार आहे आणि तो नाकारणे चुकीचे ठरेल असे श्वानप्रेमी बोलत असतात. त्याबद्दल दमत न ु ाही. परंतु अशा घटना जेव्हा घडतात तेव्हा त्यांची भूमिका काय असते हेही समजायला हवे. ज्या मुलाचा मृत्यू झाला त्याच्या पालकांचे सांत्वन होणार आहे की नाही? त्यांच्या मुलाच्या जगण्याच्या अधिकाराची काळजी कोण घेणार आहे? की असे नागरिक ज्यांना भटक्या कु त्र्याच्या हल्ल्यास सामोरे जावे लागते, त्यांची संघटना नसल्यामुळे त्यांच्या मृत्यूचा शोक होणार नाही? ही घटना संवेदनाशून्य आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. भटक्या कु त्र्यांना विनाकारण मारणे जसा गुन्हा आहे तसेच त्यांना कधीही, कु ठेही खाऊ घालणे हा ही गुन्हा ठरू शकतो. ज्यांना अशा कु त्र्यांना खाऊघालायचे आहे त्यांनी बेलायक तसे करावे परंतु त्याला काही नियम आपण करणार आहोत की नाही? अशा कु त्र्यांसाठी एक निवारा-क्षेत्र उभारून त्यांची काळजी घ्यायला हरकत नाही. त्यांचा त्रास सर्वसामान्यांना का? सर्व भटके कु त्रे आक्रमक नसले तरी ते तसेच वागतील याची हमी श्वानप्रेमी घेणार आहेत काय? हैदराबाद येथील ताज्या घटनेमुळे काही दिवस ही चर्चा होत राहील, परंतु त्यानंतर श्वानप्रेमी मंडळी आपली भूतदया दाखवत राहतील. त्यांचेधाडस वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे तेन्यायालयात जाऊन कु त्र्यांवर होणाऱ्या अन्यायाचा जाब विचारू शकतात. गुन्हे दाखल करू शकतात. हैदराबादच्या दर्ुदैवी पालकांनी कोणाविरुद्ध आणि कु ठे गुन्हा दाखल करावा याचे उत्तर श्वानप्रेमी देतील काय? अल्पवयीन मुलाने वाहन चालवताना त्याच्या हातून अपघात झाला तर त्याच्या पालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊ लागला आहे. भटक्या कु त्र्यांबाबत असे करता येणार नाही कारण त्याचे पालकत्व ठरवता येत नाही. परंतु जे खाऊ-पिऊ घालतात त्यांनी निदान कायद्याचा गैरफायदा तरी उठवू नये. हैदराबाद येथील जनता या घटनेबाबत काय प्रतिक्रिया व्यक्त करते, हे पाहणे कु तूहलाचे आहे