डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम एप्रिल महिन्यात पूर्ण होणार

खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील “ड” प्रभागक्षेत्र येथील नियोजित सुरू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची पाहणी कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी पाहणी करीत आढावा घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांनी भरीव निधी दिलेला आहे. जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री या स्मारकाला निधी देत राहतील, असे खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

स्मारकाच्या ठिकाणी “ई” लायब्ररी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट या ठिकाणी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारण्यात येणार आहे. डिसेंबर अखेर स्मारक बसवण्यात येईल. जयंतीपर्यंत स्मारकाचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती श्री. शिंदे यांनी पत्रकारांना दिली.

याप्रसंगी शहर अभियंता अर्जुन आहिरे, उपायुक्त धर्यशील जाधव, सविता हिले, सहायक आयुक्त ४ जे, धनंजय थोरात सहायक आयुक्त ५ ड वार्ड, उप अभियंता श्री. गोसावी, कार्यकारी अभियंता मनोज सांगळे, नगररचनाकार सुरेन्र्द टगळे कल्याण पूर्व नगररचनाकार सचिन घुटे, माजी नगरसेवक नवीन गवळी आदीसह शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.