ठाणे: जनसेवेचे ब्रीद जपत सदैव कार्यरत असणारे गुरुतुल्य आमदार संजय केळकर यांची आशिर्वादरूपी सावली पुढची १०० वर्ष आम्हा सर्वांवर राहू दे. अशा शब्दात कोकण पदवीधरचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी आमदार संजय केळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरुपौर्णिमा आणि आ.संजय केळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाजप कोपरीचे मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ यांच्यावतीने भाविकांना ‘गुरुचरित्र’ ग्रंथ वाटपाचा विशेष कार्यक्रम शनिवारी मिठबंदर रोडवरील स्वामी समर्थ मठात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आ. निरंजन डावखरे बोलत होते. सामाजिक आणि राजकिय जीवनात आम्हा सर्वासाठी नेहमीच गुरूतुत्य असलेले आ. केळकर यांचे जीवनच गुरू चरित्राप्रमाणे आहे. निष्काम भावनेने जनसेवेत रममाण असलेल्या आ. केळकर यांचे जीवनच एक पारायण असल्याची भावना आ. निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली.
यावेळी दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मठातील सहकारी, चेतनदादा तांडेल, माजी नगरसेवक भरत चव्हाण, सुचित्रा भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, रवी रेड्डी, डॉ.समीरा भारती, राजेश गाडे, प्रमोद चव्हाण, शेखर निकम, आई प्रतिष्ठानचे अवधूत कदम, सागर गायकवाड, मनोज जाधव आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
गुरुसेवा आणि भक्तीपाठाचा संगम! धर्म, संस्कृती आणि समाजसेवेची नाळ जोडणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. वाढदिवसाच्या शुभेच्छांचा आगळा वेगळा उपक्रम राबविल्याबद्दल आ. संजय केळकर यांनी कृष्णा भुजबळ यांचे विशेष कौतुक केले.