कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिणीचा मृत्यू

मुरबाड: टोकावडे परिसरातील खुटल बारागाव येथिल धरणावर आपली तहान भागवण्यासाठी आलेल्या हरणावर भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान हरिणीचा मृत्यू झाला.

भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर नागरिकांनी हरिणीची कुत्र्यांच्या तावडीतून सुटका केली आणि वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यांनी हरिणीवर तातडीने उपचार सुरू केले, मात्र रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष डगले यांनी दिली.

सोमवारी दुपारच्या वेळेत टोकावडे परिसरातील खुटल बारागावच्या जंगलात हरणाचा कळप नजिकच्या धरणावर पाणी पिण्यासाठी आला असता त्यातील एक हरीण भरकटले. ते भटक्या कुत्र्यांच्या नजरेत येताच त्यांनी त्यांच्यावर हल्ला करून जखमी केले.