डावखरे आणि माधवी नाईक भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत

ठाणे: भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारणीमध्ये विधानपरिषदेचे सदस्य आमदार निरंजन डावखरे आणि ॲड. माधवी नाईक यांची नियुक्ती करण्यात आल्याने कार्यकर्त्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण यांनी राज्यातील प्रदेश कार्यकारणी जाहीर केली असून आ. डावखरे आणि ॲड.माधवी नाईक यांची प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी १२ उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस ११ चिटणीस, एक कोषाध्यक्ष, एक उपकोषाध्यक्ष, युवा मोर्चा, महिला मोर्चा, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटक्या विमुक्त जाती जमाती मोर्च्याच्या अध्यक्षांच्या नावाची देखिल घोषणा श्री. चव्हाण यांनी केली आहे.

आ. डावखरे आणि आ.संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महापालिकेत भाजपने घवघवीत यश मिळवले होते. श्री. डावखरे हे संघटनात्मक कार्यक्रम राबवत असून कोकण पदवीधर मतदार संघातून ते विधान परिषदेवर निवडून गेले आहेत त्यामुळे त्यांना कोकणची जबादारी देण्यात आली आहे.