ठाणे जिल्ह्यात कोरोनाची उसळी

ठाणे : जिल्ह्यात अनेक महिन्यानंतर आज नवीन कोरोना वाढीचा आलेख वर गेला असून आज ७१ नवीन रुग्णांची भर पडली तर ठाणे शहरात ५२ रूग्ण सापडले. सक्रिय रुग्णांचा आकडा दोनशेच्या पुढे गेला आहे. एक रूग्ण दगावला आहे.

ठाणे महापालिका हद्दीत सर्वाधिक ५२रूग्ण सापडले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका परिसरात पाच, नवी मुंबई आणि भिवंडी येथे प्रत्येकी चार, ठाणे ग्रामिण भागात तीन अशा एकूण जिल्ह्यात ७१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात सात लाख ४७,९०५जण बाधित सापडले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ३०६जणांवर उपचार सुरू आहेत.

आत्तापर्यंत सात लाख ३६,३९४ रूग्ण ठणठणीत बरे झाले आहेत तर ११,९७१जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे शहरात आत्तापर्यंत २१६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.