सेंचुरी रेयॉन अंतिम फेरीत

ठाणे: आज येथील दादोजी कोंडदेव स्टेडिअमवर झालेल्या ‘क’ गटातील अटीतटीच्या उपांत्य फेरीत सेंचुरी रेयॉनने झी एंटरटेनमेंटची १४९ धावसंख्या सात गडी गमावून ओलांडत अंतिम फेरीत प्रवेश केला.

विजयी संघातर्फे सेंचुरी रेयॉनचा मध्यमगती गोलंदाज प्रदीप पांडेने २३ धावांत तीन विकेट घेतल्या तर आठव्या क्रमांकावर फलंदाजीस येत ३७ चेंडूत एक चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद २२ धागा फाटकावून विजय साजरा केला. मृगेश पानसरे- कृणाल जैन यांनी प्रदीप पांडेची सामनावीर म्हणून निवड केली.

संक्षिप्त धावफलक ‘क’ गट (उपांत्य फेरी) झी एंटरटेनमेंट ३३ षटकात ९ बाद १४९ (प्रथमेश कडू २९, विशाल दीक्षित ३७, प्रदीप पांडे ७-२-२३-३, रोशन जाधव ७-१-२०-३, गणेश ढोणे ६-०-२७-१, दिनेश यादव ६-१-३०-१, आनंद भालेराव ७-०-३५-१) पराभूत वि. सेंचुरी रेयॉन ३०. शतकात ७ बाद १५१ विनय केणे ४० प्रशांत तारेने २६, प्रदीप पांडे नाबाद २२, प्रश्नात पारिंदा ३-०-२१-१, विशाल दीक्षित ४.४-०-१८-२, अभिषेक येल्दी ५-०-२३-१, प्रथमेश कडू ३-०-२२-१)