कर्जत यार्डची होणार सुधारणा
ठाणे : मध्य रेल्वे 9, 10 आणि 11 मे 23 रोजी कर्जत यार्ड बदलाच्या संदर्भात कर्जत स्थानकावर 3 ब्लॉक्समधील 21 पोर्टल्स (प्रत्येक ब्लॉकमध्ये 7 पोर्टल्स) काढून टाकण्यासाठी अप, डाउन आणि मिड लाईनवर 3 विशेष वाहतूक आणि पॉवरब्लॉक सकाळी 11 ते दुपारी 1वाजेपर्यंत चालवणार आहे.
कर्जतहून दुपारी 12 वाजता आणि 1.15 सुटणारी खोपोली लोकल आणि खोपोलीहून सकाळी 11.20 आणि दुपारी 12.40 वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहतील.
यामुळे अप मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे नियमन करण्यात येणार आहे. हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस सकाळी 10.32 ते 11.25 पर्यंत लोणावळा येथे नियमित केली जाईल आणि निर्धारित वेळेच्या 2 तास 10 मिनिटे उशीरा पोहोचेल. कोईम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस, पुणे हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (मंगळवार), चेन्नई सेंट्रल-एलटीटी साप्ताहिक एक्सप्रेस (बुधवारी) आणि चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस (गुरुवारी) पुणे जंक्शन येथे नियमन करण्यात येतील. चेन्नई सेंट्रल-एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस 15 ते 20 मिनिटे उशीराने निघेल.