नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत यंदा भाजपची पिछेहाट झाली असून गत 2019 च्या निवडणुकीत मिळालेल्या जागांच्या तुलनेत 63 जागा घटल्या आहेत. तर, आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पक्षाने मोठी आघाडी घेत 16 जागांवर विजय मिळवला आहे.
देशातील 29 राज्य आणि सात केंद्रशासित प्रदेशातील एकूण 36 ठिकाणी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित एनडीए आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या असून भाजपा 240 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यानंतर, काँग्रेस 99 जागांसह द्वितीय क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला असून इंडिया आघाडीत सर्वाधिक जागा घेणारा पक्ष काँग्रेस ठरला आहे. देशातील सर्वात मोठ्या पाच राजकीय पक्षांचा विचार केल्यास, समाजवादी पार्टी 37 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस 29 जागांसह चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत तामिळनाडूतील डीएमके पक्ष 22 जागांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
विविध राज्यातील संख्याबळ
उत्तर प्रदेश-80
समाजवादी -37
भाजप – 33
काँग्रेस – 6
राष्ट्रीय लोक दल – 2
आझाद समाज पार्टी – 1
अपना दल – 1
महाराष्ट्र-48
काँग्रेस – 13
भाजपा – 9
शिवसेना ठाकरे – 9
राष्ट्रवादी शरद पवार – 8
शिवसेना शिंदे – 7
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार – 1
अपक्ष – 1
पश्चिम बंगाल-42
तृणमूल काँग्रेस – 29
भाजप – 12
काँग्रेस – 1
मध्य प्रदेश-29
भाजपा – 29 (सर्वच)
राजस्थान-25
भाजप – 14
काँग्रेस – 8
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) – 1
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी – 1
भारतीय आदिवासी पार्टी – 1
गुजरात-26
भाजपा – 25
काँग्रेस -1
बिहार-40
जयदू – 12
भाजप – 12
लोकजनशक्ती – 5
राष्ट्रीय जनता दल – 4
काँग्रेस – 3
कम्युनिस्ट पार्टी ( मार्क्सवादी) – 2
हिंदुस्तानी आवाम मोर्चा – 1
अपक्ष – 1
कर्नाटक-28
भाजप – 17
काँग्रेस – 9
जनता दल – 2
तामिळनाडू-37
डीएमके – 22
काँग्रेस – 9
विसीके – 2
कम्युनिस्ट पार्टी – 2
एमडीएमके – 1
भारतीय केंद्रीय मुस्लीम लीग – 1
केरळ-20
काँग्रेस – 14
आययुएमएल -2
कम्युनिस्ट पार्टी – 1
भाजप – 1
केरळ काँग्रेस – 1
आरएसपी – 1
आंध्र प्रदेश-25
तेलुगू देसम – 16
वायएसआरसीपी – 4
भाजच – 3
जनसेना – 2
तेलंगणा-17
भाजप -8
काँग्रेस – 8
एमआयएम – 1
पंजाब-13
काँग्रेस – 7
आप – 3
शिरोमणी अकाली दल – 1
अपक्ष – 2
हरयाणा-10
काँग्रेस – 5
भाजप – 5
झारखंड-14
भाजप – 8
झारखंड मुक्ती मोर्चा – 3
काँग्रेस – 2
एजेएसयुपी – 1
हिमाचल प्रदेश-4
भाजप – 4
अरुणाचल प्रदेश-2
भाजप – 2
आसाम-14
भाजप – 9
काँग्रेस – 3
युपीपीएल – 1
एजीपी – 1
मेघालय-2
व्हीओटीपीपी – 1
काँग्रेस – 1
मिझोरम-1
झेडपीएम – 1
नागालँड-1
काँग्रेस – 1
मणिपूर-2
काँग्रेस – 2
छत्तीसगड-11
भाजप – 10
काँग्रेस – 1
गोवा-2
भाजप – 1
काँग्रेस – 1
उत्तराखंड-5
भाजप – 5
त्रिपुरा-2
भाजप – 2
ओडिशा-21
भाजप – 20
काँग्रेस – 1
सिक्कीम-1
सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा – 1
केंद्रशासित प्रदेश
जम्मू काश्मीर-6
जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स – 2
भाजप – 2
अपक्ष- 2
लडाख-1
अपक्ष – 1
लक्षद्वीप-1
काँग्रेस – 1
दिल्ली-7
भाजप-7
पाँडेचरी-1
काँग्रेस – 1.
अंदमान निकोबार-1
भाजप-1
दादरा नगर हवेली आणि दिव-दमण-2
भाजप – 1
अपक्ष – 1