ठाणे: ठाणे महापालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक व वर्तकनगर (प्रति शिर्डी) साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीभाई नईबागकर यांचे सोमवारी अल्पश: आजाराने ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दु:खद निधन झाले. मृत्युसमयी ते ८० वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना व नातु असा परिवार आहे. बळीराम नईबागकर हे माजिवडे ग्रामपंचायत सदस्य होते तर ठाणे महापालिकेत दोनवेळा वर्तकनगर भागातून नगरसेवक म्हणूनही निवडून गेले होते. समाजकारण आणि राजकारण याची गल्लत न करता सामाजिक जीवनात नेहमीच बळीभाई यांनी सर्वासमोर वेगळा आदर्श ठेवला होता. त्यांच्या निधनाने ठाण्यात शोककळा पसरली आहे.