पण दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी उचलले
ठाणे : बदलापूर अत्याचार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापल्यानंतर पोलिसांनी बुधवारी (दि.3) शाळेच्या संस्थाचालकांना अटक केली होती. मात्र, आज आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
बदलापूर अल्पवयीन अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटे यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता यायालयाने एका गुन्ह्यात जामीन मंजूर केला आहे. मात्र, पोलिसांकडून दुसऱ्या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली आहे.
काल एका गुन्ह्यात अटक करुन आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज त्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. दरम्यान, आता पोलिसांनी परत ताबा मागितला आहे. हिमाचल प्रदेश आणि केरळच्या केसेसचे दाखले न्यायालयात देण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात जामीन मिळाला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी ताबा मागितला आहे. 351 सीआरमध्ये पोलिसांना ताबा देण्यात आला आहे. पोलिस उद्या आरोपींना न्यायालयात हजर करतील.