पाच वेळा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया गतविजेता इंग्लंडला आज बाहेरचा दरवाजा दाखवेल?

Photo credits: Google

ऑस्ट्रेलियाने या विश्वचषक स्पर्धेतील त्यांचे पहिले दोन सामने जरी गमावले असतील, परंतु पाच वेळच्या विश्वविजेत्याने त्यांच्या पुढील चार सामन्यांमध्ये विजय मिळवून बाकी संघांच्या मनात दहशत नक्की निर्माण केली आहे. दुसरीकडे, इंग्लंडने आपल्या विजेतेपदाच्या बचावासाठी फारसा काही प्रयत्न केलेला दिसत नाही. सहा सामन्यांत केवळ एकमेव विजय नोंदवत, गतविजेते गुणतालिकेत अगदी तळाशी बसले आहेत. इंग्लंड कसा तरी विजय मिळवू शकेल आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघांना रोखू शकेल? शक्यता कमी आहे, पण क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकता हे आपण बघत आलो आहे.

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा ३६ वा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ४ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांनी १९७१ ते २०२२ दरम्यान एकमेकांविरुद्ध १५५ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ८७ जिंकले आहेत, इंग्लंडने ६३ जिंकले आहेत, दोन सामने बरोबरीत संपले आहेत आणि तीन सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात त्यांनी तीन एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलिया दोन जिंकले आहेत आणि इंग्लंडने एक जिंकला आहे. विश्वचषकात, त्यांच्या नऊ सामन्यांपैकी, ऑस्ट्रेलियाने सहा आणि इंग्लंडने तीन जिंकले आहेत.

 

  ऑस्ट्रेलिया इंग्लंड
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट)
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने ८७ ६३
भारतात
विश्वचषकात

 

आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला सातवा सामना खेळतील. त्यांच्या सहा सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने चार आणि इंग्लंडने एक विजय मिळवला आहे.

 

सामना क्रमांक ऑस्ट्रेलिया इंग्लंड
भारताकडून ६ विकेटने पराभव न्यूझीलंडकडून ९ विकेटने पराभव
दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव
श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव अफगाणिस्तानकडून ६९ धावांनी पराभव
पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव दक्षिण आफ्रिकेकडून २२९ धावांनी पराभव
नेदरलँड्सचा ३०९ धावांनी पराभव श्रीलंकेकडून ८ विकेटने पराभव
न्यूझीलंडचा ५ धावांनी पराभव भारताकडून १०० धावांनी पराभव

 

संघ

ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, लियम लिव्हिंगस्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, ब्रायडन कार्स, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस वोक्स.

 

दुखापती अपडेट्स

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने गोल्फ कार्टमधून पडल्यानंतर कंकशनची लक्षणे दाखवली. तो इंग्लंडविरुद्धचं सामना खेळू शकणार नाही. तसेच, मिचेल मार्श वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलियाला परतल्याने तो उपलब्ध होणार नाही. याशिवाय, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसाठी दुखापतींची चिंता नाही.

 

खेळण्याची परिस्थिती

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना होणार आहे. या स्पर्धेतील तिसरा सामना हे ठिकाण आयोजित करेल. न्यूझीलंडविरुद्ध या विश्वचषकाचा ​​सलामीचा सामना नऊ गडी राखून पराभूत झाल्यामुळे इंग्लंडला या मैदानाविषयीच्या गोड आठवणी नाहीत. काळ्या आणि लाल मातीच्या खेळपट्ट्यांची उपस्थिती लक्षात घेता, परिस्थिती कुठल्या प्रकारची खेळपट्टी वापरण्यात येईल त्यावरून समजण्यात येईल. सामान्यतः, लाल मातीच्या खेळपट्ट्या धीम्या गतीच्या असतात आणि चेंडूला कमी उसळी मिळते. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत होते. दुसरीकडे, काळ्या मातीच्या खेळपट्ट्या अगदी सामान उसळी देतात आणि फलंदाजीसाठी चांगल्या असतात.

 

हवामान

हवामान बहुतांशी सूर्यप्रकाशित राहण्याची अपेक्षा आहे. दिवसभरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. २१% ढगांचे आच्छादन असेल. वारा पूर्वेकडून वाहेल.

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

डेव्हिड वॉर्नर: सहा सामन्यांत दोन शतके झळकावणारा, ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याने ६९ च्या सरासरीने आणि ११३ च्या स्ट्राईक रेटने ४१३ धावा केल्या आहेत.

अॅडम झाम्पा: ऑस्ट्रेलियाच्या या गुणवंत लेगस्पिनरने सहा सामन्यांमध्ये तीन चार विकेट हॉलसह १६ विकेट्स घेतल्या आहेत. तो त्याच्या संघासाठी सर्वात यशस्वी गोलंदाज आहे.

डेविड मलान: या विश्वचषकात २०० धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव इंग्लंडचा फलंदाज आहे. या डावखुऱ्या सलामीवीराने सहा सामन्यांत ३९ च्या सरासरीने आणि १०६ च्या स्ट्राईक रेटने २३६ धावा केल्या आहेत.

आदिल रशीद: सहा सामन्यात एकूण ६० विकेट्सपैकी, इंग्लंडला ३९ विकेट घेण्यात यश आले आहे. त्यापैकी त्यांच्या लेगस्पिनरने आठ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या हुशारीने तो फलंदाजांना त्याच्या सापळ्याला बळी पडण्यास प्रवृत्त करण्याइतपत तो आक्रमक गोलंदाजी करत आहे.

 

आकड्यांचा खेळ

  • मार्नस लाबूशेनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ३१ धावांची गरज
  • जो रूटला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ६५०० धावा पूर्ण करण्यासाठी ७९ धावांची गरज आणि विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी ६७ धावांची आवश्यकता
  • जोस बटलरला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ७२ धावांची गरज
  • ख्रिस वोक्सला (२५) विश्वचषकात इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या इयन बॉथमची (३०) बरोबरी करण्यासाठी ५ विकेट्सची गरज
  • डेव्हिड वॉर्नरला विश्वचषकात १५०० धावा पूर्ण करण्यासाठी ९५ धावांची गरज आणि विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माची (७) बरोबरी करण्यासाठी एक शतक आवश्यक
  • स्टीव्ह स्मिथला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी ५ धावांची गरज

 

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ४ नोव्हेंबर २०२३

वेळ: दुपारी २: ०० वाजता

स्थळ: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार

 

 

(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)